हिंदू महासभा आणि बाबासाहेब !
मुंबई शहर हिंदू महासभेचे अध्यक्ष रावसाहेब सी के बोले, डॉ बाबासाहेबांच्या मांडीवर आहेत आणि शेजारी माईसाहेब आहेत.भारताचा ध्वज भगवा असावा तसेच राष्ट्रभाषा संस्कृत असावी अशी हिंदू महासभेची मागणी होती आणि ती बाबासाहेब ह्यांना मान्य होती. त्याच विषयात ही भेट झाली होती.
भगवा किंवा भगवान ह्या शब्दाचा बाबासाहेब प्रेमी विरोध करतात आणि त्यावर कोणीही बोलू नका, गप्प बसा, आंबेडकर प्रेमिंना दुखवू नका असा सोईस्कर स्टॅन्ड अनेक हिंदुत्ववादी अनेकदा घेतात . पण सत्य हे आहे की हा शब्द व हा रंग आणि भगवान ही संज्ञा भगवान बुद्धांना अतिशय प्रिय होती.
हिंदू महासभेला सगळे डब्बा समजतात पण सत्य नेमके उलट आहे. बाबासाहेब हे हिंदुत्वाचे शत्रू आहेत असे हिंदुत्ववादी मानतात आणि बाबासाहेब प्रेमी पण मानतात. पण इथेही सत्य नेमके उलटे आहे. हिंदू महासभेचा अध्यक्ष मुंबई प्रांतिक मंडळावर ( विधानसभा ) निवडून यावा यासाठी डॉ आंबेडकर ह्यांनी कष्ट घेतले आहेत आणि तत्सम अनेक घटना आहेत.