महात्मा गांधी तर टोपी घालत नव्हते मग पांढऱ्या टोपीला गांधी टोपी का म्हणतात वाचा कारण
महात्मा गांधी यांचा फोटो आपण क्वचितच टोपी घातलेला बघितला असेल. अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो कि महात्मा गांधी हे टोपी घालत नव्हते पण आपल्या कडे वापरत असलेल्या टोपीस गांधी टोपी असे का म्हणतात ? तर त्याचे उत्तर आम्ही आपल्याला देणार आहोत.
वजनाला हलकी आणि वापरायला सोपी असलेली हि टोपी अहिंसेच प्रतिक मानल्या जाते. १९१९ मध्ये घडलेला हा प्रसंग आहे त्या वेळेस महात्मा गांधी रामपूरला दुसऱ्या वेळेस सैयद हमीद अली खान बहादूर यांना भेटायला गेले होते. १८८९ ते १९३० पर्यंत सैयद हमीद अली खान बहादूर हे रामपूर स्टेटचे नवाब होते. हि भेट कोटी खास बाग येथे झाली होती.
नवाबांची एक प्रथा होती जो कोणी व्यक्ती त्यांना भेटायला जात असे त्यांना आपले डोके झाकून जावे लागत असे. परंतु बापू सोबत टोपी अथवा कपडा काहीच घेऊन गेले नव्हते त्यामुळे त्यांना प्रश्न पडला आता भेट कशी घ्यावी. हा किस्सा प्रसिद्ध इतिहासकर नफीस सिद्दिकी यांनी लिहलेला आहे रामपूरच्या इतिहासावर अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत त्यानंतर महात्मा गांधी यांना शोभणारी टोपी रामपूरच्या बाजारात शोध घेण्याचे काम सुरु झाले परंतु महात्मा गांधीना या टोपी शोभून दिसत नव्हत्या. त्यानंतर आबादी बेगम महम्मद अली आणि शौकत अली ज्यांनी खिलाफत चळवळ चालू केली होती यांच्या आई आबादी बेगम यांनी ठरविले कि त्या स्वतः महात्मा गांधी यांच्या करिता टोपी शिवणार.
असा लागला शोध
दोन बाजूला टोक असलेली हि टोपी त्यांनी स्वतः बनवली जी पुढे चालून गांधी टोपी म्हणून ओळखल्या जाऊ लागली. अहिंसा आणि आत्मनिर्भरता याचे प्रतिक असलेली हि गांधी टोपी अस्तित्वात आली. भारतात सर्वात जास्त खप असलेली हि टोपी आहे.