मेंदुची स्मरणशक्ती
तूम्ही घर उघडण्यासाठी खिशातून चावी बाहेर काढता दरवाजा उघडता आणि आत जाता. काही वेळेनंतर तूम्ही किल्ली शोधता. आणि तूम्हाला ध्यानात येते की किल्ली दारालाच सोडली आहे.
टू व्हिलरची चावी सुद्धा काही वेळेस स्कूटरलाच रहाते. हे आपल्या बाबतीत घडते की नाही?उडुपीच्या हॉटेल्सना दिलेल्या भेटी लक्षात ठेवा. त्यांचे वेटर्स. त्यांच्याकडे एक अद्भुत स्मृती असते. तो एका वेळी 3-4 टेबलांवरून ऑर्डर घेतो. प्रत्येक लहान तपशील लक्षात ठेवतो, न लिहिता.
आणि न्याहारी केल्यानंतर कल्पना करा की, तूम्ही हॉटेलमध्ये तूमचे जाकीट मागे ठेवले आहे. तूम्ही हॉटेलकडे परत जाता आणि त्या वेटरला शोधता, ज्याला तूम्ही पैशाची टीप ही दिली असेल. आश्चर्य म्हणजे, वेटर तूम्हाला ओळखत नाही. तूम्ही येवून गेल्याचे तो लक्षात ठेवत नाही. कसं होतं हे असं?
मानसशास्त्रज्ञ Zeigarnik स्पष्ट करते की आपला मेंदू कसा कार्य करत असतो. एखादे कार्य पूर्ण झाले की आपला मेंदू Delete बटण दाबतो आणि आपली स्मृती पूसली जाते. आपली अल्पकालीन स्मृती माहिती टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करते. त्यामुळे ती केवळ अपूर्ण कामे Live ठेवते. आणि एखादे कार्य पूर्ण झाल्यावर ते Delete बटण दाबते. आणि म्हणूनच हॉटेल्समधील वेटर्सना तूमच्या ऑर्डरची प्रत्येक छोटीशी माहिती आठवते पण बिल तयार होईपर्यंतच.
हे देखील एक कारण आहे जेव्हा आम्ही एखाद्या दस्तऐवजाची फोटोकॉपी करतो तेव्हा आम्ही फोटोकॉपी घेतो आणि मूळ दस्तावेज मागे सोडून निघून जातो. हे किस्से हेच सांगतात की आमची अल्प-मुदतीची मेमरी पूर्ण केलेली कार्ये कशी हटवून टाकते. Interesting नाही कां?
आणखी एक उदाहरण - बँकेच्या एटीएममधून, काही वेळा तुम्ही रोख काढता { रोख काढली, काम पूर्ण झालेले असते.. } आणि तुमचे कार्ड काढून घेण्यास विसरता. हा Zeigarnik प्रभावच परंतु या गोष्टीचा आपण सर्वजण चांगला उपयोग करू शकतो. सीरियल्समध्ये प्रत्येक एपिसोड एका वळणावर संपतो. प्रत्येक भाग अशा ठिकाणी संपतो जिथे तूम्ही म्हणता 'पुढे काय'? तूम्हाला जाणून घ्यायचे असते, अन् प्रोड्यूसर्सना तूम्हाला परत आणायचे असते.आणि म्हणून त्या भागाच्या शेवटी 'Open End' ठेवून तो भाग संपवतात. आणि तीच बाब आपल्याला दूसऱ्या दिवशी सिरियल्स पहायला भाग पाडते.
कदाचित आपल्या सर्वांसाठी एक शक्तिशाली कल्पना जर तूम्हाला काही बाबी स्मरणातून घालवायच्या नसतील तर त्यात थोडी अपूर्णता ठेवा.
आपण आदल्या दिवशी आपला रोजचा ब्लॉग लिहितो. तो किंचीत अपूर्ण ठेवल्याची खात्री करा. दूसऱ्या दिवशी तुमचा मेंदू आधल्या दिवशी मनात असलेल्या सर्व गोष्टी परत मन:पटलावर आणतो आणि काहीतरी नवीन ताजा विचार ब्लाॅगला जोडून द्यायला ही मदत करतो.संघाच्या शाखेत स्मरणशक्तीचा एक खेळ घेतला जातो. त्यात एका Sequence ने 60-70 महापुरुषांची नावे दर टर्नला आपलं अजुन एक नाव जमा करीत. जेष्ठ मंडळी लक्षात ठेवू शकतात. खेळ संपताच सहजगत्या मेमरीतून Delete करतात.जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे संचालक असा युक्तिवाद करतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः जास्त व्यावहारिक असतो. या वयात, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धांचा परस्पर संवाद अतिशय सुसंवादी बनतो, ज्यामुळे आपल्या सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो. म्हणूनच 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तूम्हाला असे बरेच लोक आढळतात जे त्यांचे उपक्रम अधिक सर्जनशील पद्धतीने करतात. माझा वैयक्तिक अनुभव, मी Multi-Tasker रहायचा प्रयत्न करतो आणि कामे पार पाडूनही बाकी उरतो.
अर्थात, मेंदू तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नसतो. तथापि, तेथे मेंदूला एक लवचिकता प्राप्त होते. म्हणून, या वयात,आपण योग्य निर्णय घेण्याची अधिक शक्यता असते आणि नकारात्मक भावनांना आपण कमी सामोरे जातो. मानवी बौद्धिक क्रियाकलाप या शिखर वयाच्या आसपास उद्भवतात, जेव्हा मेंदू पूर्ण शक्तीने कार्य करण्यास सुरवात करतो.