काफीर हैं वो, जो बंदे नहीं इस्लामके..!"
आपल्यापैकी बहुतेकांना पंडीत द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहीती नसेल. नसीम.या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९ व्या शतकातील अतिशय महान शायर पंडीत दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडीत द्वारकानाथांना अतिशय कमी - अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतु आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत.
कौल घराणं काश्मीरी पंडीतांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी.
त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे.एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कवीसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं.
द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडीतजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी ऊर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्या ओळी आधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा!
यांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली -
"काफीर हैं वो जो बंदे नहीं इस्लामके"
[इस्लामला न मानणारे काफीर असतात]
काफीर म्हणजे "ईश्वराला न मानणारे".
मुस्लीम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ "इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे" असा करतात. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अश्या या काफीरांचं काय करावं याबद्दल कुरआनात मनोरंजक आज्ञा दिल्या आहेत, त्या प्रत्येकाने, विशेषत: सर्वधर्मसमभाववाल्या मित्रांनी अवश्य वाचाव्यात!
असो! तर नवाबाने उपरोक्त ओळ दिल्या दिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले.
या ओळीवर दुसरं काहीच लिहीलं जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे पंडीतजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने साऱ्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते.
पंडीतजींना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.
होता होता पंडीतजींची पाळी आली!
त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,
लाम की मानिन्द गेसू हैं मेरे घन:श्यामके ।
काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।"
{"लाम" अक्षरासारखे वळणदार, मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घन:श्याम मुरारी कृष्णाचे}
(फारसीत "ल" अक्षराला "लाम" असे म्हणतात.)
काफीरच म्हटलं पाहिजे त्यांना, जे भक्त नाहीत या "लाम"चे!
("इस्लामके" नव्हे तर पंडितजींनी फोड केलीय "इस लामके")]
पार नवाबासह सारी सभा अवाक झाली !
पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणा-यांना "काफीर" ठरवलं होतं.
काव्यप्रतिभेत स्पर्धा केली असती तर गोष्ट वेगळी, परंतु धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणा-यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडितजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते! पंडितजींची वाहवाह करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता!
असे हे पंडीत द्वारकानाथ कौल !
आजकालच्या धर्मनिरपेक्ष युगात हा "सांप्रदायिक" कवी धर्मांध ठरून विस्मृतीच्या गर्तेत जाणे स्वाभाविकच आहे! स्वयंघोषित धर्मनिरपेक्षांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणा-या शिक्षणपद्धतीत तयार झालेल्यांना तर पंडितजींचे नावही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही!
परंतु सत्य हे कुणा विचारधारेला बांधील नसून, शाश्वत असते. कोंबडा झाकल्याने काही सूर्य🌞 उगवायचा थाबंत नाही !
त्यामुळे ज्यांना अन्य धर्मांसोबतच स्वधर्माच्या अभिमानाची देखील अजूनही चाड उरली आहे, अश्यांसाठी ही घटना उजेडात आणणे आवश्यक आहे, असे वाटते. यानिमित्ताने तरी या महान कवीच्या स्मृती जाग्या रहातील, त्यांना उजाळा मिळेल, त्यांच्यापासून कुणीतरी पुन्हा प्रेरणा घेईल,
किमान पंडितजींच्या लेखनाचा, काव्याचा अभ्यास करेल; ही भाबडी अपेक्षा!