वेदना न होता, काही क्षणातच मृत्यू; स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला कायदेशीर मान्यता

वेदना न होता, काही क्षणातच मृत्यू; स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्या यंत्राला कायदेशीर मान्यता



मागील काही वर्षांत जगभरात आत्महत्या करण्य़ाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भारतात आत्महत्या कायदेशीर गुन्हा मानला जातो. मात्र अनेक देशांमध्ये आत्महत्येला कायदेशीर मान्यता आहे. स्वित्झर्लंडमध्ये आत्महत्येला कायदेशीर मान्यता असून येथे आत्महत्येसाठी यंत्रही तयार करण्यात आलं आहे.

स्वित्झर्लंडमध्ये आधीपासूनच इच्छामृत्यूला परवानगी आहे. आता काही क्षणातच कोणताही त्रास न होता, आत्महत्या करता येईल, अशा यंत्राला स्वित्झर्लंडमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या यंत्राच्या निर्मात्याने या संदर्भात माहिती दिली.
मृत्यूची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या आवडत्या ठिकाणी या यंत्राला नेलं जातं. त्यानंतर तेथील ऑक्सिजनची पातळी अतिगंभीर पातळीवर आणून त्या व्यक्तीला इच्छामरण दिलं जातं. एखादा व्यक्ती शरिराचा कोणताही अवयव हलवू शकत नसेल आणि केवळ डोळ्यांची हालचाल करू शकत असेल तरी त्याला या यंत्राच्या सहाय्याने आत्महत्या करता येऊ शकते.

स्वित्झर्लंडमध्ये गेल्या वर्षी 1300 लोकांनी इच्छामृत्यूसाठी एनजीओच्या सेवांचा वापर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर एक्झिट इंटरनॅशनल या एनजीओचे संचालक डॉ. फिलीश नित्शके यांनी आत्महत्येसाठी यंत्र विकसीत केलं. 2022 मध्ये हे यंत्र मृत्यूची इच्छा असलेल्या लोकांच्या सेवेत दाखल झाले आहे. या यंत्राच्या मदतीने नायट्रोजनची पातळी वाढवून ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने