विनोदी चुटकुले,वकील

वकील



महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने वकिलाला विचारले...

"सर, 'वकिली' म्हणजे काय?"

वकील म्हणाले, "यासाठी मी एक उदाहरण देतो.

समजा दोन लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होण्याचा सल्ला देतो.

विनोदी चुटकुले,वकील

आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल?"

एक विद्यार्थी म्हणाला, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."

वकील म्हणाले, "नाही, फक्त स्वच्छ माणूसच हे करेल... कारण, त्याला आंघोळ करायची सवय आहे तर घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचे महत्त्व कळत नाही."

वकील : "आता सांगा कोण आंघोळ करेल?"

दुसरा विद्यार्थी म्हणाला, “स्वच्छ व्यक्ती.”

वकील म्हणाले, “नाही, घाणेरडा माणूस आंघोळ करेल कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे.

आता सांग, कोण आंघोळ करेल?"

दोन विद्यार्थी म्हणाले, “जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल."

वकील म्हणाले, “नाही, दोघेही आंघोळ करतील… कारण स्वच्छ माणसाला आंघोळ करायची सवय असते आणि गलिच्छ माणसाला आंघोळ करावी लागते.

आता सांगा आंघोळ कोण करणार?"

आता तीन विद्यार्थी एकत्र म्हणाले, “हो, दोघेही आंघोळ करतील."

वकिलाने सांगितले, “चुक, कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला आंघोळ करण्याची सवय नसते तर स्वच्छ माणसाला आंघोळ करण्याची गरज नसते.

आता सांगा आंघोळ कोण करणार?"

एक विद्यार्थी नम्रपणे म्हणाला, "सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देता आणि प्रत्येक उत्तर बरोबर असल्याचे दिसते. आम्हाला योग्य उत्तर कसे कळणार?"

वकिलाने सांगितले, "वकिली म्हणजे हेच आहे... वास्तव काय आहे हे महत्त्वाचे नाही... पण तुमचा मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा आणि किती युक्तिवाद मांडू शकता हे महत्त्वाचे आहे."

तर मग तुम्हीच सांगा, कोण आंघोळ करेल? 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने