इतिहासातील एक घोटाळा

इतिहासातील एक घोटाळा 





काही वर्षापूर्वी इतिहासाचा एक घोटाळा पकडला गेला आहे. याची चर्चा विद्वानांनी करणे आवश्यक आहे. इ. स. 2015 मध्ये हरियाणातील  राखीगढ़ीमध्ये खोदाई झाली होती. यात 5 हजार वर्षे पुरातन दोन मानवी सांगाडे सापडले होते.

इतिहासातील एक घोटाळा

पुरातत्व विभाग आणि जेनेटिक साइंटिस्टच्या अधिका-यांनी त्या सांगाड्यांची दोन वेळा डीएनए चाचणी करून घेतली.एक डीएनए चाचणी अमेरिकेत झाली. तर दुसरी भारतातच झाली. जो डीएनए अहवाल प्राप्त झाला त्यावर जेनेटिक साइंसच्या वैज्ञानिकांनी तीन वर्षेपर्यंत वेगवेगळ्या जातींचे 300 रक्ताचे नमुने घेऊन सखोल संशोधन केले. संशोधनाअंती दिसून आले की सांगाड्यांचे जीन व नमुन्यात घेतलेले भारतीयांचे जीन मॅच होतात. संशोधनात असेही दिसून आले की, त्या 5000 वर्षांपूर्वीच्या पुरातन सांगाड्याचे जीन अफगाणिस्तानी व पाकीस्तानी लोकांच्या जीनशीही मॅच हीतात. 

मग संशोधन गटाच्या वैज्ञानिकांनी अहवाललेखन करून डीएनएचे मॅच झालेले नमुने जगातील सर्व संशोधकांना दाखवले. त्यानंतर म्हणजे पाच दिवसांपूर्वी हा अहवाल भारतात सार्वजनिक केला गेला की,"आर्य बाहेरून आलेले नव्हते व ते आक्रमकही नव्हते. तर ते भारताचे मूळ निवासी आहेत. आणि अफगाणिस्तानापासून कन्याकुमारीपर्यंत सर्व आर्य वंशाचे आहेत. सर्वांचा डीएनए एक आहे.

कटू सत्य

...परंतु कटू सत्य हे आहे की-"आर्यांचे बाहेरचे असण्याचा सिद्धांत फक्त मुस्लिम आणि इंग्रज बाहेरचे असण्याच्या सिद्धांताशी मेळ घालण्याची एक चाल होती आणखी काही नाही. पाश्चिमात्यांमधील टी. बरो, म्युर, एलफिन्स्टन इत्यादी इतिहासकारांनी अतिशय स्पष्टपणे आपल्या-आपल्या पुस्तकांमध्ये लिहिले आहे--"भारतात आर्यांचा परदेशी होण्याचा कोणता पुरावा किंवा दुरान्वयानेही कुठलेही संकेत नाहीत."

....आपण आर्यांचे बाहेरचे असण्याचा सिद्धांत तीन इंग्रज इतिहासकारांनी घडवला. 1)मार्टिमर व्हिलर 2)स्टुअर्ट3)डाइजेस्ट.

...यांपैकी मार्टिमर व्हिलर जो होता तो संस्कृत आणि वैदिक संस्कृत बिलकुल शिकलेला नव्हता. तो 1956-57 मध्ये उज्जैनमध्ये आला होता. तेव्हा एक महान पुरातत्वविद्वान पद्मश्री डाॅ. विष्णू श्रीधर वाकणकर ज्यांनी गुप्त झालेल्या सरस्वती नदीचा शोध लावला होता, त्यांनी उज्जैनमधील हाॅटेलात मार्टिमर व्हिलरशी इंग्रजीत वार्तालाप केला होता. त्या वार्तालापाचा आंशिक उल्लेख करणे आवश्यक आहे नाहीतर आपण हे कटकारस्थान समजू शकणार नाहीत. (डाॅ. वाकणकर हे प्रसिद्ध भारती पुरातत्वतज्ज्ञ होते. ससरस्वती नदी व भीमबेटाची गुहा शोधल्याबद्दल त्यांना पद्मश्री पदवी देण्यात आली होती.)

डाॅ. वाकणकर --: मी आपणांस काही विचारू शकतो का? 

मार्टीमर व्ह्वीलर -- अवश्य.

.डा. वाकणकर --: आपण वैदिक संस्कृत आणि संस्कृतीशी परिचित आहात कात ?

व्ह्वीलर --: नाही. का ?

डाॅ. वाकणकर --: आपण म्हटले आहे हड़प्पा-मोहनजोदड़ो शम्बरांचे नगर होते ?

व्हीलर --: हा ! नक्कीच. 

डा. वाकणकर --: आपण वेदांमध्ये शम्बरांच्या नगरांविषयी काय म्हपले गेले आहे, ते जाणता का ?

व्हीलर --: मी नही जाणीत. ते काय आहे ?

डा. वाकणकर --: " य: शम्बरम् पर्वतेषु क्षिपन्तम् " शम्बर पर्वतीय प्रदेशात राहणारे होते. मैदानी प्रदेशातील नव्हते.

व्ह्वीलर --: मी वाचलेले नाही. 

.डा. वाकणकर --: मी ग्रिफिथचे वैदिक ग्रामर आणलेले आहे. यात याचा उल्लेख आहे.

व्ह्वीलर --: मी जाणीत नाही आणि जाणू इच्छित ही नाही. 

डा. वाकणकर --: तर बोलणे व्यर्थ आहे. धन्यवाद.

हा वार्तालाप वाटल्यानंतर डोक्यात प्रकाश पडतो की आपणा आर्यांना परदेशी सिद्ध करणारा इतिहासकार संस्कृतसंबधी किती शुन्य ज्ञानी होता. परदेशी इतिहासकारांनी आर्य परदेशी ठरविण्यापूर्वी प्रथम फक्त दोन ग्रंथ महाभारत आणि योगावाशिष्ठ वाचले असते तर हा घोटाळा करावा लागला नसता. 

असो. या दोन्ही धर्मग्रंथांमध्ये आर्य कोणाला म्हटले गेले ते पहा --:

महाभारतात आर्यची परिभाषा(व्याख्या)--: " कर्तव्यमाचरन् कार्यं करोति स: आर्य इति स्मृत: "---: अर्थ - कर्तव्याला अनुकूल आचरण वालें करणा-याला आर्य  म्हणतात......... आता योगावाशिष्ठात आर्यची परिभाषा(व्याख्या) --: " कर्तव्यमाचरण कामं अकर्तव्यमाचरन् तिष्ठति। प्रकृतिचारे स तु आर्य इति स्मृत: ..अर्थ --: योग्य कार्य करणारा आणि अयोग्य कार्य न करणारा आर्य म्हटला जातो.


लेखक --: संजीत सिंह ,पटना यांच्या हिंदी लेखाचा मराठी अनुवाद -- जगन्नाथ दंडवते 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने