विनोदी चुटकुले,मॉल

 

विनोदी चुटकुले,मॉल



एक महिला खरेदीसाठी मॉलमधे गेली होती. कॅश काउंटरवर तिने पैसे देण्यासाठी पर्स उघडली. कॅशिअरला तिच्या पर्समध्ये टीव्हीचा रिमोट दिसला.

तिला कुतूहल वाटले, हा पर्समध्ये कशाला? मग हळूच विचारलं,

"तुम्ही तुमच्या टीव्हीचा रिमोट नेहमी सोबत ठेवता का?"

ती म्हणाली, "नाही, नेहमी नाही, पण माझ्या नवऱ्याने आज फुटबॉलच्या सामन्यामुळे माझ्यासोबत खरेदीला येण्यास नकार दिला, म्हणून मी रिमोट घेतला."

बोध : नेहमी पत्नीची साथ द्या आणि तिच्या आवडीनिवडी जपा.

विनोदी चुटकुले,मॉल

थांबा, गोष्ट अजून संपली नाही…

कॅशिअर हसली आणि मग त्या महिलेने खरेदी केलेल्या सर्व वस्तू तिने परत घेतल्या.


यामुळे धक्का बसलेल्या त्या महिलेने कॅशियरला कारण विचारले…


ती म्हणाली, "तुमच्या नवऱ्याने तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहे.........."


बोध : तुमच्या पतीच्या छंदांचा नेहमी आदर करा.


थांबा, गोष्ट अजून संपली नाही…

पत्नीने पर्समधून पतीचे क्रेडिट कार्ड काढले आणि ते स्वाइप केले. नवऱ्याच्या दुर्दैवाने त्याने स्वतःचे कार्ड ब्लॉक केले नव्हते.


बोध : आपल्या पत्नीची शक्ती आणि शहाणपण कमी लेखू नका.


थांबा, गोष्ट अजून संपली नाही…

स्वाइप केल्यानंतर, मशीनने सूचित केले, 'तुमच्या मोबाईलवर पाठवलेला पिन प्रविष्ट करा'......


बोध : जेव्हा पुरुष हरतो, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी मशीन पुरेसे हुशार असते!

थांबा, गोष्ट अजून संपली नाही…

ती स्वतःशीच हसली आणि तिच्या पर्समधला वाजत असलेला पतीचा मोबाईल हातात घेतला.

फॉरवर्ड केलेला एसएमएस दाखवत तिने पिन प्रविष्ट केला.

रिमोट कंट्रोल घेताना तिने त्याचा फोनदेखील ऊचलला होता, जेणेकरून खरेदी करत असताना त्याचा फोन येणार नाही.

ती वस्तू विकत घेऊन आनंदाने घरी परतली.

बोध : हताश स्त्रीला कमी लेखू नका!

थांबा, गोष्ट अजून संपली नाही…

घरी पोहोचल्यावर तिच्या लक्षात आलं, पोर्चमध्ये त्याची गाडी नव्हती.

दारावर एक चिठ्ठी चिकटवली होती.

"रिमोट सापडला नाही. प्रीमियरशिप मॅच पाहण्यासाठी मित्रांसोबत बाहेर जात आहे. घरी यायला उशीर होईल. काही हवे असल्यास माझ्या फोनवर कॉल कर".

तो जाताना घराची चावीदेखील घेऊन निघून गेला होता.

बोध : आपल्या पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही नेहमी हराल.

तर मित्रहो, अखेर……





Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने