❤️ हार्टअटॅक, कॅन्सरचा धोका कमी करणारे औषध विकसित
एक नवे औषध विकसित करण्यात आले आहे की, त्याच्या वापराने ‘हार्ट अॅटॅक आणि कॅन्सर’चा धोका कमी केला जाऊ शकतो, असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे.अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानंतर संशोधकांनी हा दावा केला आहे.
या औषधाच्या सेवनाने हृदयविकाराचा धक्का आणि कॅन्सर होण्याचा धोका कमी केला जाऊशकतो, असे त्यांचे मत आहे. ‘हॉर्वर्डयुनिव्हर्सिटी’तील मुख्य संशोधक डॉ. पॉल रिडकर यांनी सांगितले की, या नव्या औषधाने उपचार जगतात नव्यायुगाची सुरुवात होणार आहे.
संशोधकांच्या मते, ‘कॅनेकईनुमेब’ असे या औषधाचे नाव असून त्याच्या वापराने वात व अन्य काही आजारही बरे होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या औषधाने पुन्हा हार्टअॅटॅक येण्याची शक्यता 24 टक्यांनी कमी होते. @डॉ. रिडकर यांनी बार्सिलोनात नुकत्याच झालेल्या ‘युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस’मध्ये या अनोख्या आणि बहुपयोगी औषधाची माहिती दिली. आपल्या जीवनातील अशी ही पहिली वेळ आहे की, आपण हृदय विकार कमी करणार्या औषधाचे प्रदर्शन करत आहे.भविष्यात याचा निश्चितपणे वापर वाढून हृदयविकारासंबंधीच्या आजाराचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.