कोरफड एक अनेक फायदे

 कोरफड एक अनेक फायदे





कोरफड ही औषधी वनस्पती! तिचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे आहेत. त्याचबरोबर त्याचे अन्य फायदे आहेत. ते आज जाणून घेऊ.. 

शीत गुणधर्म

  कोरफडीचा रस हा गुणधर्माने शीत असतो. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंथा शांत राहते.
कोरफड एक अनेक फायदे

आपल्या शरीरातील दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. सांध्यांच्या दुखण्यासाठी 

ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे असते त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस मात करतो.

कोलेस्ट्रॉलसाठी मदत 

 कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते. 

वजन नियंत्रित ठेवते 

 कोरफडीचा रसाचे रोजच्या सेवनाने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते .

मुख शुद्धी 

 कोरफडीच्या सेवनाने तोंडाची स्वच्छता राखली जाते. त्यामुळे घश्याच्या आजारापासून मुक्ती मिळते.

मधुमेहावर उपयोगी 

 तुम्ही जर कोरफडीचा रस रोज सेवन केला तर, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. 

डोळ्यांचे सौंदर्य वाढवते 

 ग्लासभर पाणी आणि कोरफडीच्या रसाने सकाळी डोळे स्वच्छ धुतल्यास स्वच्छ व निरोगी होतात. 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने