म्हणुन पोलीस गणवेश खाकी असतो

 


म्हणुन पोलीस गणवेश खाकी असतो

पोलिसांची ओळख म्हणजे खाकी वर्दी. भारतातील बरयाच राज्यात पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय की, पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का असतो? पिवळा,काळा, लाल किंवा इतर का नाही
म्हणुन पोलीस गणवेश खाकी असतो

इंग्रजानी जेव्हा भारतात पोलीस व्यवस्था चालू केली, तेव्हा भारतीय पोलिसांचा गणवेश खाकी नाही तर पांढरा होता. पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरणं सोयीस्कर नव्हतं कारण, काम करताना हा गणवेश लगेच खराब व्हायचा. त्यामुळे पोलिसांना हा गणवेश वापरताना अडचणी यायच्या.म्हणजेच पांढरा रंग मळखपाऊ नव्हता.
यावर उपाय म्हणून पोलिसांच्या गणवेशाचा रंग बदलण्याची योजना आखली गेली. 

गणवेशाचा रंग पांढराऐवजी बदलून खाकी करण्यात आला. 

त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी चहाच्या पानांचा वापर करुन एक रंग तयार केला. या रंगाला 'खाकी' नाव दिलं. हा रंग बनवण्यासाठी सुरुवातीला चहाच्या पानांचा वापर केला जायचा, मात्र आता सिंथेटिक रंग वापरले जातात. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढराऐवजी बदलून खाकी करण्यात आला. खाक या शब्दाचा हिंदी अर्थ गाढ मातीचा रंग असा आहे. या खाकी रंगामुळे पोलिसांच्या वर्दीवर धूळ, डाग कमी दिसतील.खाकी रंग हा हलका पिवळा आणि तपकिरी रंग यांचं मिश्रण आहे.हा रंग मळखपाऊ असल्याने यावर लवकर डाग पडत नाहीत. त्यानंतर पोलीस गणवेशासाठी सरकारने अधिकृतपणे खाकी रंग स्वीकारण्यात आला. अशाप्रकारे भारतीय पोलीस खात्याचा अधिकृत गणवेश 'पांढऱ्या' रंगावरून 'खाकी' रंग झाला, हा रंग आजही वापरला जात आहे. म्हणुन पोलीस खाकी वर्दीत दिसतात.

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने