आयुष्यमान कार्डसाठी असा करा अर्ज
मिळेल ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
आयुष्यमान कार्ड ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेत मोफत उपचार घेता येतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येतात.
या योजनेतंर्गत या मिळतात सुविधा
या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे.
या कागदपत्रांची आवश्यकता
मोबाइल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
रेशन कार्ड
इनकम सर्टिफिकेट | opt
या योजनेसाठी असा करा अर्ज
आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी या साठी वेबसाइट: https://pmjay.gov.in/ या साइटवर जा
नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.सर्व कागदपत्रे अपलोड करा.पूर्ण अर्ज एकदा तपासबमिट करा.
========================