ब्रम्हचारी हनुमान पिताही होते
हनुमान हे ब्रह्मचारी आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की ते विवाहित असण्यासोबतच ते एका मुलाचे पिता देखील होते.पराशर संहितामध्ये हनुमानाच्या विवाहाचा उल्लेख आहे. हनुमानाला भगवान सूर्य यांनी प्रशिक्षित केले होते. जेव्हा सूर्यदेव त्यांना अनेक विद्या शिकवत होते, तेव्हा ते एका धर्मसंकटात सापडले. कारण काही विद्या अशा होत्या ज्या फक्त विवाहित पुरुषालाच शिकवल्या जाऊ शकत होत्या. पण हनुमान हे अविवाहित होते. अशा परिस्थितीत सूर्यदेवाने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.
हनुमानजी यांनी सूर्यदेवाचा प्रस्ताव मान्य केला. पण, आता त्यांना विवाह योग्य कन्या मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर सूर्यदेवाने हनुमानाला आपल्या तेजस्वी आणि तपस्वी कन्या सुवर्चलाबरोबर लग्न करण्यास सांगितले. यानंतर हनुमानाचे लग्न सुवर्चलाशी झाले आणि त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाकडून पूर्ण शिक्षा ग्रहण केली.लग्नानंतर सुवर्चला कायमची तपश्चर्यात मग्न झाली. त्यामुळे विवाहित असूनही हनुमान जी नेहमीच ब्रह्मचारी राहिले. .
वाल्मिकी रामायणात पुत्र मकरध्वजचा उल्लेख आहे.
वाल्मिकी रामायणात यांनी हनुमानाच्या मुलाचा उल्लेख आहे. ज्यावेळी अहिरावणने राम लक्ष्मणचे अपहरण केले आणि त्याला पाताळ पुरी येथे नेले. तेव्हा राम लक्ष्मणच्या मदतीसाठी पातळ पुरी येथे पोहोचलेल्या हनुमानाची भेट पाताळाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मुलगा मकरध्वजशी झाली. जो दिसायला अगदी वानरासरखा होता. तो हनुमानजीला आपला परिचय देत म्हणाला की मी हनुमान पुत्र मकरध्वज आहे आणि मी पाताळ पुरीचा द्वारपाल आहे.
मकरध्वजचं ऐकून हनुमानना राग आला, तेव्हा मकरध्वज त्यांना त्याच्या उत्पत्तीची कहाणी सांगितली. मकरध्वज म्हणाला, जेव्हा तुम्ही रावणाची लंका जाळली, तेव्हा अग्नीच्या ज्वालांमुळे तुम्हाला घाम फुटण्यास सुरुवात झाली. शेपटीची आग विझविण्यासाठी आपण समुद्रात उडी मारली. त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाचा थेंब निघाला जो एका माशाने तिच्या तोंडात घेतला आणि ती गरोदर राहिली काही काळाने अहिरावणाच्या सैनिकांनी समुद्रातून त्याच माशाला पकडून आणले. जेव्हा माशाचं पोट कापण्यात आलं तेव्हा माझा जन्म झाला. अशी हि कथा आहे.