शीतपेय, "फंटा" ची जन्मकहाणी
जर्मनीमध्ये १९३०-४० च्या दशकात हिटलर सोबतच अजून एक मोठी शक्ती उदयास येत होती, ती म्हणजे "कोका-कोला".त्याचे असे झाले कि कोका-कोला कंपनीने १९२९ दरम्यान नाझी जर्मनीमध्ये पाय रोवले आणि त्याचं सगळं श्रेय "मॅक्स काईथ" नावाच्या इसमाला जाते. त्याने एकहाती ह्या अमेरिकन कंपनीच बस्तान हिटलर च्या नाझी जर्मनीमध्ये बसवलं.हे विशेष आहे.अमेरिकेची कंपनी असूनसुद्धा मॅक्सने जर्मन सरकारला असं काही गुंडाळलं होतं की १९३८ पर्यंत कोका-कोलाच्या जर्मनीत जवळपास ४९ फॅक्टरी उभ्या राहिल्या.
अल्कोहोलीक पेयांची शौकीन असलेल्या जर्मन लोकांना एक साधा सोडा विकणं तसं कठीण काम होतं पण तत्कालीन परिस्थिती मॅक्स च्या मदतीला आली. मॅक्सने जागतिक महामंदीचा फायदा उठवत अगदी माफक दरात जर्मनीमध्ये कोका-कोला च साम्राज्य उभं केलं.
कामगारांची सेना आणि प्रचंड जाहिरात कौशल्याच्या जोरावर मॅक्स ने शतकांच्या अल्कोहोलीक पेयांची परंपरा असलेल्या जर्मनीला कोका-कोला प्यायला भाग पाडलं, इतकं की अमेरिकेच्या बाहेर जर्मनी ही कोका-कोलाची सगळ्यात मोठी बाजारपेठ बनली.
पण १९३८ दरम्यान नाझी सैन्याने पोलंडवर आक्रमक केले आणि सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धाला.
सरकारातील आपल्या ओळखीचा फायदा करून घेत मॅक्स ने फक्त जर्मनीतीलच नाही तर अख्ख्या युरोपातील कोका-कोलाच्या फॅक्टरी जर्मन सैन्याच्या तावडीतून वाचवल्या.
https://parg.co/UV8q
पण १९३८ दरम्यान नाझी सैन्याने पोलंडवर आक्रमक केले आणि सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धाला.
सरकारातील आपल्या ओळखीचा फायदा करून घेत मॅक्स ने फक्त जर्मनीतीलच नाही तर अख्ख्या युरोपातील कोका-कोलाच्या फॅक्टरी जर्मन सैन्याच्या तावडीतून वाचवल्या.
https://parg.co/UV8q
फंटा नामकरण
१९४५ च्या दरम्यान नाझी सरकारच्या पतनादरम्यान मॅक्स काईथ ने सर्वतोपरी प्रयत्न करत कोका-कोला आणि फंटा ला जिवंत ठेवले. मित्रराष्ट्रांच्या विजयानंतर अमेरिकन सैन्य सोबतच कोका-कोला चे शास्त्रज्ञ जर्मनीत दाखल झाले आणि तेथील उत्पादनाला नवसंजीवनी मिळाली.
मॅक्स काईथ अमेरिकन हिरो बनला
भयंकर अशा महायुद्धात, शत्रूराष्ट्रात कोका-कोलच्या रूपाने "अमेरिकन स्पिरिट" जिवंत ठेवत "फॅसिस्ट प्रवृत्तींसोबत हातमिळवणी न केल्याबद्दल" मॅक्स काईथ अमेरिकन हिरो बनला. पुढे त्याच जोरावर कोका-कोला कंपनीचा चेअरमन बनल्यानंतर मॅक्स ने त्याच्या प्रिय आशा "फंटा" च सुधारित रूप जगासमोर आणलं.आज जगातील अनेक राष्ट्रांत तेथील परिस्थितीनुसार जवळपास ७० प्रकारांत मिळणारं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे "फॅसिस्ट" प्रवृतींना पुरून उरलेलं "फंटा" हे एकमेव शीतपेय आहे.
हे पण वाचा ; रेल्वे फलाटवर खुणा केलेल्या फरशा का असतात.