म्हणून रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X, LV का लिहितात
रेल्वेच्या शेवटचा डब्यावर मोठा X का लिहिलेला असतो, याचा अर्थ काय आहे? माहित आहे का?
हा मोठा X केवळ प्रवासी गाड्यांवरच लिहिलेला असतो. हा X नेहमीच रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेला असतो, म्हणजेच तो त्या रेल्वेचा शेवटचा डबा आहे हे ओळखते.पॅसेंजर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X सोबतच एका छोट्या बोर्डवर LV पण लिहिलेले असते.या LV चा अर्थ लास्ट व्हेईकल असा आहे. ही दोन्ही चिन्हे प्रामुख्याने रेल्वे अधिकारी व कर्मचार्यांसाठी तयार केली आहेत.जर रेल्वे कर्मचाऱ्याला रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर एक्स X किंवा एलव्ही LV लिहिलेले दिसले नाही तर तो तातडीने जवळच्या कंट्रोल रूमला कळवतो. जर ही दोन्ही चिन्हे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर दिसत नसतील तर याचा अर्थ असा होतो की ट्रेनचा शेवटचा डबा किंवा मागील भागातील काही भाग रेल्वेपासून वेगळा झाला आहे. किवां काहीतरी विपरीत घटना घडली आहे असा त्याचा अर्थ होतो.