म्हणुन डॉक्टर सफेद/हिरव्या रंगाचा युनिफॉर्म वापरतात
दवाखान्यात डॉक्टर व त्यांचे सहाय्यक सहकारी आॅपरेशन करतेवेळी बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. मात्र या रंगांचे कनेक्शन काय आहे? ते माहीत आहे का?पांढरा रंग हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक मानला गेला आहे. विविध रोगाच्या प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ शकतो तो येऊ नये, त्यांना शांत व समाधान वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा युनिफॉर्म घालतात.
पहिल्या महायुद्ध काळात १९१४ मध्ये एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या/ निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.
अहवालानुसार 'टूडे सर्जिकल नर्स' (१९९८) या वैद्यकिय अहवालामध्ये एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे की, हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले.व ते सर्वाना मान्य पण झाले. उदाहरणार्थ जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते.हा अनुभव तुम्हाला असेलच वैद्यानिक दृष्टीकोणातून जर विचार केला तर आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत.यामुळे डोळयांना शांतता लाभते.
ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो.व डोळे ऱखरखतात. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही.हे बरयाच डॉक्टरांनी अनुभवले आहेत.
वरील सर्व बाबींचा विचार केल्या नंतर आपल्या लक्षात आले असेलच हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर का पसंत करतात.म्हणुन जगभरात सर्व डॉक्टर दवाखान्यात आॅपरेशन करताना पांढरा किंवा हिरवा रंग असलेला युनिफॉर्म वापरतात.