तुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा



तुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा   


 तुम्ही आपल्या स्मार्टफोनला “स्पाय डिवाईस” मध्ये रुपांतरीत करू शकता!एक छोटीशी सेटिंग करून आपण आपल्या स्मार्टफोन ला एक “स्पाय टूल” बनवू शकतो, तसेच मुलांवर नजर ठेवणाऱ्या डिवाईसमध्ये बदलू शकता. ही ट्रिक खूप सोप्पी आहे.त्यासाठी तुम्ही तुमचा फोन वरील ‘Auto Answer Incoming calls’ चे ऑप्शन अनेबल करून अश्या जागी ठेवा जिथून तुम्ही इतरांचे बोलणे ऐकू शकाल.त्यानंतर रिमोट एरियामध्ये जाऊन त्या फोनवर कॉल करा. त्यानंतर तुमचा डिवाईस ऑटोमॅटिकली कॉल रिसीव्ह करणार आणि तुम्ही जिथे फोन ठेवलाय तिथून तुम्ही त्या सर्व गोष्टी ऐकू शकाल
 जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेलं आणि तो परत मिळणार नसल्याची कुठलीही अपेक्षा उरलेली नसेल. तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या फोनला लॉक करू शकता.म्हणजे तुमचा मोबाईल ज्याने कोणी चोरला असेलं, तो त्याच्या काहीही कामाचा उरणार नाही कारण तो कामच करणार नाही.ह्यासाठी तुमच्या मोबाईल कंपनीमध्ये कॉल करा, आणि त्यांना आपला १५ डीजीटचा IMEI नंबर सांगा आणि आपला फोन लॉक करून घ्या. ह्यानंतर तुमच्या फोनचे सर्व फीचर्स लॉक होऊन जातील.
फोनला तुम्ही “मायक्रोस्कोप” बनवू शकता   जर तुम्हाला तुमचा फोन मायक्रोस्कोप मध्ये बदलायचा असेलं, तर तुम्हाला कुठल्याही महाग डिवाईस विकत घेण्याची गरज नाही. कुठल्याही लहान आणि स्वस्त लेन्सचा वापर करून देखील तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला मायक्रोस्कोप बनवू शकता. आणि कुठल्याही वस्तूची अगदी “मॅग्नीफाईड फोटोज” घेऊ शकता.
नॉन वॉटरप्रूफ स्मार्टफोनने देखील “अंडर वॉटर फोटोज” घेऊ शकता जर तुमचा फोन हा वॉटरप्रूफ नाही आहे तरी देखील तुम्ही तुमच्या फोनने पाण्याच्या खाली देखील फोटो घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या फोनसाठी एक पॉलीथीन केस बनवावी लागेल. ते बनविल्या नंतर तुम्ही निश्चिंत होऊन पाण्याच्या आत देखील फोटोज घेऊ शकता.

स्मार्टफोनमध्ये फेस लॉक कसं लावणार?

आपल्या स्मार्टफोनला खराब होण्यापासून वाचवा


.            ጦඹիiᎢi 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने