विमान प्रवासात नारळ नेण्यास बंदी आहे
जेव्हा आपण विमान प्रवास करतो तेव्हा कोणत्या गोष्टी सामानातून घेऊन जायच्या किंवा कोणत्या वस्तूंचा तुम्ही विमानात वापर करू शकत नाही याबद्दल अनेक सूचना आपल्याला दिल्या जातात.
लाइटर, ड्राय सेल बॅटरीसारख्या ज्वलनशील तर चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूंसह, सुकलेला नारळदेखील तुम्ही विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
सुकलेल्या नारळाचा आकार, वजन विमान प्रवासात एखाद्या दुर्घटनेत शस्त्रे म्हणून काम करू शकतात किंवा विमानाचे नुकसान करू शकतात किंवा प्रवाशांना यामुळे इजादेखील होऊ शकते.नारळाच्या वरचा भाग कडक असतो (म्हणजेच त्याचे कवच कठीण असते) आणि आत द्रव (लिक्विड) असतो. विमान आकाशात उंचावर गेल्यावर हवेचा दाब बदलल्यामुळे नारळ फुटण्याचा धोका असतो, ज्यामुळे विमान प्रवासात गोंधळ निर्माण होऊ शकतो किंवा सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. विमानातील सर्व जण सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी एअरलाइन्सने कठोर धोरणे लागू केली आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शस्त्र म्हणून काम करू शकणाऱ्या वस्तूंना सहसा विमानात नेण्यास बंदी घातली आहे.सुकलेल्या नारळातील अतिरिक्त आर्द्रता (ओलावा) प्रवाशांसाठी अस्वस्थ आर्द्र (दमट) वातावरण तसेच विमानांच्या वेंटिलेशन सिस्टममध्ये संभाव्य समस्या निर्माण करू शकते. याचा अर्थ, जर नारळातून पाणी गळत असेल तर विमानाच्या आतील हवा दमट होऊ शकते, ज्यामुळे प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे विमानाच्या यांत्रिकीसाठीही अडचणी येऊ शकतात.तसेच एअरपोर्टवर द्रव (लिक्विड) पदार्थ घेऊन येण्यासाठीचे कडक नियम आहेत. सुकलेल्या नारळातला द्रव पदार्थ १०० मिलिलिटरच्या मर्यादेपेक्षा जास्त असतो, त्यामुळे तो सामानातून आणण्यास बंदी आहे
सुकलेला नारळ कोणत्याही विमान प्रवासात गोंधळ निर्माण करू शकतात. एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, नारळाचे टुकडे लवकर पसरतात, ज्यामुळे वातावरण खराब होते आणि प्रवाशांसाठी, क्रूसाठी एक गडबडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुकलेल्या नारळात आर्द्रता असते, ज्यामुळे केबिनच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात बदलू शकते, यामुळे प्रवाशांना अस्वस्थता आणि समस्यांना सामोरे जावे लागते.
अशांतता, आपत्कालीन परिस्थितीत नारळासारख्या कठीण वस्तू धोकादायक शस्त्र बनू शकतात, ज्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होतो