पिंगळा. लोककला..नामशेष होण्याच्या मार्गावर

  पिंगळा. लोककला..नामशेष होण्याच्या मार्गावर

पिंगळ्याने वर्तविलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती व ती आजही तशीच असली तरी पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे.डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सूर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा .
पिंगळा. लोककला..नामशेष होण्याच्या मार्गावर
कुडमुडे जोशी समाजातील पिगंळा.प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात. परंतु कित्येक लोककला सध्या अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकीच एक पिंगळा हि लोककला !





असे एकनाथ महाराजांचे एक भारुड आहे. तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते.गळ्यात कवड्याची माळ, देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर, गळ्यात एक छोटी झोळी, धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं!
आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि मग निघतो गावमागणीला. डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुर्योदयाच्या वेळी पारंपरिक गाणी, अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा, धान्य आणि पैसे देतात. मग खाशा स्वारी खूष होऊन आशिर्वादपर काव्य रचते. ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने