गूढ ग्रंथ निळावंती.

 गूढ  ग्रंथ  निळावंती.

गूढ असा ग्रंथ म्हणजे निळावंती. ग्रंथाचा मुख्य विषयच आहे पशु पक्ष्यांची गूढ भाषा समजावून घेणे आणि त्यांच्याकडून जमिनीवर अथवा जमिनीखाली असलेल्या धनाच्या साठ्यांचा शोध घेणे. जे पशु पक्षी असतात त्यांना गुप्तधनाचे साठे कुठे असतील ते ठावूक असते.जर त्यांची भाषा शिकून त्यांना वश करून घेतलं तर त्यांच्याकडून अशा धनाच्या साठ्याचा तपास लागू शकतो हा निळावंती ग्रंथाचा मुख्य आशय आहे.

गूढ  ग्रंथ  निळावंती.

असे म्हटले जाते की या ग्रंथत सांगितलेली विद्या जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तो एक तर पूर्णपणे यशस्वी होतो नाहीतर पूर्णपणे वेडा होतो.जगातलं एकमेव ग्रंथ आहे की यात दिलेले मंत्र जर तुम्ही सिद्ध केले तर तुम्ही जगावर सुद्धा राज्य करू शकता. पण  जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झाला नाहीत  तर एक तर तुम्ही वेडे होऊ शकता किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो.

निळावंती ही एका खूपच श्रीमंत माणसाची तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या माहेरची परिस्थिती खूपच चांगली होती.निळावंती चा जन्म होतो तेव्हा तिच्या वडिलांना खूप सारे गुप्तधन मिळते आणि ते त्या गावचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात.निळावंती लहानपणी  एकटी राहत असे त्यामुळे ती  निसर्गातील झाडे पशुपक्षी यांनाच आपला मित्र मानत असे.निळावंती साठी अनेक पशु पक्ष्यांची फौज काम करायची तिला कुठले कुठले धनसाठे सांगायची.ती  आपल्या शेतामध्ये एका झाडाखाली बसली  होती.  अचानक तिला कसला तरी आवाज ऐकू येतो. जेव्हा ती आसपास पाहते तेव्हा तिथे कोणीच नसते. ती थोडीशी घाबरते.तिच्या असे लक्षात येते की दोन मुंग्या आपापसात  संभाषण करीत होत्या आणि त्या येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या घराला पाण्यापासून कसं वाचवायचं या विषयांवर बोलत होत्या.मुंग्यां तिला असे काही मंत्र देतात ज्या मुळे तिला बऱ्याच इतर प्राण्यांच्या भाषा समजू लागतात. बऱ्याच प्राण्यांकडून आणि पक्षांकडून तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या.  मुंगूस सारखे प्राणी तिला गुप्ता धानाचे रस्ते दाखवत होते.  मुंगूस कुबेराचे वाहन मानले जाते आणि मुंगसाला गुप्त धनाबद्दल पूर्ण ज्ञान असते.

निळावंतीचे बापाने लग्न करून दिले एकदा सासऱ्याबरोबरनिळावंती माहेरी जात असता तिला मुंगसाची जोडी दिसते. त्यातील मुंगशिण निळावंती बरोबर संवाद साधते. मुंगुसाची बायको तिला आपला नवरा आंधळा असल्याचे सांगते. त्यावर निळावंती मण्याचा लाल तुकडा लावून मुंगुसाला डोळे देते.प्रवासात त्यांना एक म्हातारा माणूस भेटतो.  चालता चालता तो माणूस त्यांना साप आणि नागमणी यांची गोष्ट सांगतो.निळावंती चा पती हे सर्व पाहतो तेव्हा त्याला वाटते की ही एक विचित्र बाई आहे.म्हणून तो तिला सोडून देतो. नवऱ्याने सोडून दिल्यानंतर निळावंती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचते  आणि तिला माहित असते  की ती आता जास्त दिवस जिवंत राहणार नाही.  तेव्हा ति हे सारे मंत्र ही सारी विद्या लिहिण्याचा निर्णय घेते आणि हे सर्व मंत्र एका ताम्रपत्रावर  लिहून काढते.  जेव्हा हा ग्रंथ लिहून पूर्ण होतो.तोच  गूढ  ग्रंथ  निळावंती.

या ग्रंथमध्ये मंत्र कसे सिद्ध करायचे हे सर्व सांगितले गेले आहेत पण याच्यामध्ये हेही सांगितले गेली आहे या विद्येचा दुरुपयोग केला तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि ती व्यक्ती वेडी होईल त्यामुळे ज्यांना कोणाला ही विद्या आत्मसात करायची आहे त्यांनी एकदम निस्वार्थ भावनेने हे पुस्तक वाचले पाहिजे.बर्‍याच जणांनी हे पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेच लोक अजूनही प्रयत्न करीत आहेत. 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने