अंब्रेला धबधबा भंडारदरयाचे "अप्रतिम वैभव.

अंब्रेला धबधबा भंडारदरयाचे "अप्रतिम वैभव.
------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 
----------------------------------
 छत्रीचा आकारात कोसळणारा हा धबधबा
नाशिक जवळ भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला आहे. https://m.facebook.com/story.php?story_fbid=195406380857293&id=100011637976439

 छत्रीचा आकारात कोसळणारा हा धबधबा नाशिक शहरापासून ५० कि.मी. अंतरावर आहे.जवळच असलेल्या पुलावरून हा छत्रीचा आकाराचा धबधबा पाहता येतो. हा धबधबा ही महाराष्ट्रातील इतर काही धबधबा प्रमाणे फक्त पावसाळा तच धबधबा याचे सौंदर्य खुलून येतं. भंडारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे .
भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, भंडारदरा धरणाच्या खालील बाजूंला हा धबधबा आहे. हा धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ आहे.
अंब्रेला धबधबा भंडारदरयाचे "अप्रतिम वैभव.,Umbrella Waterfall Bhandardarya’s “unparalleled splendor.

महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे.
पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी (६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा उपलब्ध आहे.
भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.♍

======================================= 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने