वंदे मातरमच्या घोषणा द्या, एक रुपयांत पेट्रोल घेऊन जा; जाणून घ्या कुठे आहे ही स्कीम
==========================
माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव
दि. २९ जून २०२१
देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असून सामान्य माणूस महागाईने हैराण झाला आहे. अशा वेळी गुजरातच्या एका संस्थेने अनोख्या पद्धतीने या दरवाढीचा निषेध केला आहे. वंदे मातरमच्या घोषणा द्या आणि एक रुपयांत पेट्रोल डिझेल घेऊन जा असे संस्थेने जाहीर केले आहे. त्यासाठी संस्थेने 300 लिटर पेट्रोल डिझेलचे कूपनही विकत घेतले आहे.
इंधनाच्या वाढत्या दराचा निषेध करण्यासाठी काही लोक वेगवेळ्या क्लृप्त्या लढवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीने सेंच्युरी गाठली होती तेव्हा मध्य प्रदेशच्या एका तरुणाने बॅट आणि हेल्मेट घेऊन पेट्रोल पंपावर सलामी दिली होती. आता वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. त्यासाठी एकच अट आहे. ग्राहकांनी वंदे मातरमच्या घोषणा द्यायच्या आणि एक रुपयांत पेट्रोल डिझेल घेऊन जायचे.
टीम रीव्हॉल्युशन संस्थेने 300 लिटर डिझेल पेट्रोल वाटण्याचे जाहीर केले आहे. हे पेट्रोल डिझेल ग्राहकांना केवळ एक रुपयांत मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा द्यावा लागणार आहेत.
सोमवर सकाळी अकरा वाजल्यापासून ही योजना सुरू झाली आहे. इंधन दरवाढीच्या निषेधात सामन्य नागरिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख स्वेजल व्यास यांनी केले आहे. तसेच एक लिटर पेट्रोलचे 300 कूपन विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. जो ग्राहक वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देईल त्यांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळेल असेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी इंधनाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 29 जूनपासून पेट्रोल 29 पैश्यांनी तर डिझेलची किंमत 28 पैश्यांनी वाढली आहे.
==========================
माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव
==========================