तुमच्याकडे या खास नंबरची कोणतीही नोट असेल, तर घरबसल्या होईल मोठी कमाई; जाणून घ्या डिटेल्स
==========================
*_〽️माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव〽️_*
*दि. २८ जून २०२१*
तुम्हाला चलनी नोटा आणि नाणी (Currency notes and coins) गोळा करण्याचा छंद असेल तर आता काही नोटा आणि नाण्यांचा ऑनलाईन लिलाव (Online auction) करून पैसे कमवण्याची संधी आहे. सध्या अनेक वेबसाइट्सवरून अँटिक नोटा आणि नाण्यांचा लिलाव केला जातो. तुम्हाला जर ऑनलाईन लिलावातून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्याकडे 1, 2, 10, 100, 500, 2000, 200 रुपयांच्या चलनी नोटांवर फक्त एक गोष्ट असणं गरजेचं आहे.
जर तुमच्याकडे ही नोट असेल तर...
तुमच्यकडे अनेक चलनी नोटांचा संग्रह असेल पण त्यात 786 क्रमांकाची सीरिज असलेली नोट असेल तर तुम्ही ई-बे वेबसाइटवर (eBay Website) जाऊन त्याचा लिलाव करू शकता. त्या लिलावात तुम्हाला त्या नोटेच्या विक्रीतून लाखो रुपये मिळण्याची शक्यता आहे. सामान्यत: भारतातील दुर्मिळ चलनी नोटा आणि नाणी यांची विक्री ई-बे पोर्टल ऑनलाइन पद्धतीने केली जाते. या लिलावात कुणीही भाग घेऊ शकतं. 786 ला शुभ आणि भाग्यशाली अंक मानलं जातं. त्यामुळे कदाचित एखादी व्यक्ती तुम्ही मागाल ती रक्कम देऊन ही नोट विकत घेईल. तुम्हाला लक्षात असेल तर कुली चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 786 क्रमांकाचा कुलीचा बिल्ला वापरत असतो. समाजातील अनेक जण 786 या अंकाला शुभ आणि लकी अंक मानतात. त्यामुळे त्यांना या अंकाशीसंबंधित वस्तू जवळ ठेवायच्या असतात. अशाच एखाद्या व्यक्तीने बोली लावली तर तुम्हाला लखपती किंवा करोडपती होण्याची संधी मिळू शकते.
कुठे विकाल ही 786 वाली नोट -
प्रत्येक नोटेवर एक सीरिज क्रमांक असतो. त्यामध्ये जर 786 अंक असेल तर ती चलनी नोट विकत घेण्यासाठी लोक प्रयत्न करतात. त्यासंबंधी त्यांच्या श्रद्धा असतात. तुम्हाला तुमच्याकडे असलेली अशी नोट विकायची असेल तर तुम्ही ई-बे (eBay) आणि क्लिक इंडिया (Click India) यासारख्या अनेक वेबसाइट्सवर जाऊन तुमच्या नोट किंवा नाण्याचा फोटो अपलोड करू शकता. त्या लिलावात सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल. क्लिक इंडिया साइटवर थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून विक्री करण्याची लिंकही उपलब्ध आहे.
==========================
*माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव*
==========================