माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….!

 माहित नसलेल्या गुगलच्या लय भारी ट्रिक्स….! 


____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌀
____________________________
दि. ९ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3g8778v
गुगल हेफक्त एक सर्च इंजिन नसून अजून बरेच काही आहे. जर आपल्याला गुगलमध्ये लपलेल्या रंजक गोष्टी माहित पडल्या तर आपल्यासाठी गुगल हे एक मनोरंजनाच संपूर्ण पॅकेज आहे. चला मग जाणून घेऊया गुगलमध्ये कोणत्या रंजक गोष्टी लपलेल्या आहेत…
🌀 १. बॅरेल रोल…
गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Do a barrel roll” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर तुमची स्क्रीन वर्तुळाकार गोल फिरेल.              
╔══╗ 
║██║      M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
🌀 २. द अटरी ब्रेकआउट गेम
जर तुम्ही खूप कंटाळलेले असाल आणितुम्हाला काही मनोरंजक खेळ खेळायचे असतील तर तुम्ही गुगलचा अटरी ब्रेकआउट हा गेम खेळू शकता. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही “Atari breakout” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर जी सर्वात पहिली प्रतिमा येईल त्यावर क्लिक केल्यानंतर हा गेम सुरू होतो.
🌠३. गुगलच्या क्षेत्राशी काही प्रयोग करू इच्छित असाल तर…
आपल्यातील बहुतेकांना हे माहित नसेल, गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Google Sphere” हे टाकून झाल्यानंतर लगेच एन्टर न करता, त्याच्याच खाली दिलेल्या “I’m feeling lucky” वर क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण स्क्रीन गोलाकार आकार बनवेल. हे दिसण्यास खूप अप्रतिम असते.
🌀४. फिल्प क्वाइन
आपल्याला जर टॉस करायचा असेल तर आपण गुगलच्या फिल्प क्वाइन या ट्रिकचा वापर करू शकतो. त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याठिकाणी दिलेल्या माइक वर क्लिक करून “फ्लिप क्वाइन” असे बोलावे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट.
🌀५. गुगल ग्रॅव्हीटी
हा अजून एक वेळ घालवण्यासाठी वेगळे वैशिष्ट्य गुगलने दिले आहे.त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर “Google Gravity” असे टाइप करावे आणि “I’m feeling lucky” वर क्लिक करावे, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरील भागांचे तुकडे इकडे – तिकडे उडताना दिसतील.
🌀६. फक्त चेहरा
या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्याफोटोमधील फक्त त्यांचे चेहरे पाहायचे असल्यास पाहू शकता. याचा वापर तुम्ही फोटो सर्च मारल्यानंतर प्रतिमा विभागामध्ये गेल्यानंतर सॉर्टिंगसाठी तुम्हाला खूप पर्याय दिलेले असतात, त्यासाठी डावीकडील टूल्स या पर्यायामध्ये जावे.
🌀७. मेलीझा
गुगलच्या या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला एलियनशी गप्पा मारायला भेटतात, म्हणजे तसे भासवले जाते. Google Earth 5 या वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये “Meliza” टाइप कर आणि आतमध्ये जा.
🌀८. टाइमर सेट करा
या वैशिष्ट्याचा उपयोग टाइमर सेट करण्यासाठी होतो. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये “Set timer for 5 minutes” टाइप करा आणि जादू बघा.
🌀९. लहान मुलांना प्राण्यांचे आवाज ऐकावा
हे गुगलच वैशिष्ट्य कदाचित तुम्हाला माहित नसेल. फक्त सर्च बॉक्समध्ये “Cat noises” टाइप करा आणि एन्टर करा. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू शकता.
🌀१०. प्ले पॅक मॅन
हा पॅक मॅन नावाचा गेम खेळण्यासाठी सर्च बॉक्समध्ये “Pac-Man” टाइप करा आणि एन्टर करा आणि त्यानंतर तुम्ही हा मनोरंजक गेम खेळू शकता.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634* ☜♡☞
🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  🔵
______________________
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने