आता ‘पासवर्ड’ इतिहासजमा होणार!
____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌀
____________________________
दि. १२ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3wOQkgf
गुगलसह इतर वेबसाइटवरील ई-मेल व विविध खात्यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे हे सर्वासाठीच कठीण काम असते. मात्र, यापुढे तुमचा चेहराच तुमचा ‘पासवर्ड’ असणार आहे. लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच ई-मेल व इतर खाते आपोआप उघडणार आहे. त्यामुळे पासवर्ड ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे.आयफोनमध्ये असलेली फेसआयडी ऑथेंटिकेशनची सुविधा आता संगणक आणि लॅपटॉपमध्ये देण्यात येणार आहे. ╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
या तंत्रज्ञानामुळे युजर्सना पासवर्डशिवाय अकाऊंटमध्ये लॉग-इन करता येणार आहे. फिडो अलायन्स आणि डब्ल्यू थ्रीसी या संकेतस्थळांनी नवीन वेब ऑथेंटिकेशन स्टॅण्डर्ड इन्क्रिप्टेड हे तंत्रज्ञान आणले आहे.त्यामुळे पासवर्ड, फिंगरप्रिंट सेंसर, कॅमेरा आणि यूटीबी बटनशिवाय केवळ चेहरा समोर नेताच अकाऊंट उघडता येणार आहे. मोझिला फायरफॉक्समध्ये या तंत्राचा समावेश करण्यात आला असून गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टसुद्धा ही सुविधा युजर्सना देणार आहेत.
लवकरच गुगलवर ‘साउंड पासवर्ड’
आपले अकाउंट हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलही सरसावले असून नुकताच गुगलने ‘स्लिक-लॉगिन’ या इस्रायली कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी ध्वनीवर आधारित कोड तयार करण्यामध्ये तज्ज्ञ मानली जाते. या कंपनीच्या मदतीने गुगलही लवकरच आपल्या अकाउंट्ससाठी विशिष्ठ ध्वनींमुळेच उघडणारे पासवर्ड आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________