🟣डीएनए टेस्ट म्हणजे काय? ती कशी करतात? समजून घ्या..🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - ५ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
DNA म्हणजे Deoxyribonucleic Acid , हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या संपूर्ण शरीर व्यवस्थेची माहिती आपल्या DNA च्या माध्यमातून काढता येते. DNA च्या मदतीने शरीरातील आजारांपासून ते आपल्या वंशावळीपासून ते गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत सर्वांची माहिती काढता येते. त्यासाठी DNA टेस्टिंग केली जाते.
परंतु DNA चा आकार हा ३२ BP इतकाच असतो म्हणजे अत्यंत सुक्ष्म. मग या एव्हढायशा DNA ची टेस्टिंग करून एवढी माहिती कशी मिळवली जाते? तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
DNA म्हणजे काय ?
DNA टेस्टिंगचा सर्वात मूलभूत अंग म्हणजे DNA Molecules. त्यात व्यक्तीचा संपूर्ण जेनेटिक डेटा असतो, जो जेनेटिक कोडच्या स्वरूपात असतो.
डोळ्याचा रंगापासून तर शरीर रचनेचा निर्मितीला जेनेटिक कोडच्या वेगवेगळ्या टेस्ट कारणीभूत असतात. आपल्या शरीरातील पेशींपासून ते अवयवांपर्यंत, हृदयापासून त्वचेपर्यंत सर्वात DNA टेस्टच्या रुपात असतो. अगदी केसातून सुध्दा DNA व त्यातून एखाद्या माणसाची संपुर्ण माहिती जाणून घेता येत असते.
DNA हे एक डबल हेलिक्स आकृती आहे. जी एका गोल ३६०° वाकवलेल्या शिडीप्रमाणे आहेत. त्यात वेगवेगळे न्यूक्लिओटाईड कण असतात. ज्यातील Adenine, Thymine ह्यांचात एक बॉण्ड असतो आणि Cytosine व guanine यांचात एक बॉण्ड असतो. आपला जेनेटिक कोड ३ बिलियन बेस पेयर इतका लांब असतो.
DNA टेस्टिंग कशासाठी करतात ?
आपल्या DNA पैकी ९९.९ % DNA समान असतो. फक्त ०.१ % हा अगदीच नगण्य फरक एका माणसाच्या DNA पासून दुसऱ्या माणसाच्या DNA पासून वेगळा असतो. ते जे वेगळे सिक्वेन्स एका माणसाला दुसऱ्या माणसाला वेगळं बनवतात व स्वतःची अशी एक जेनेटिक आयडेंटी देतात, त्यांना जेनेटिक मार्कर म्हटलं जातं.
फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून या जेनेटिक मार्करचा उपयोग केला जातो. एखाद्या जोडप्याला जुळे बाळ जन्माला तेव्हाच येतात जेव्हा त्यांचे जेनेटिक मार्कर एकसमान असतात. जेवढे जास्त जवळचे नातेसंबंध तेवढे जास्त एकसमान जेनेटिक मार्कर असतात.
DNA Testing चा मूळ सिद्धांत हा ह्याच गोष्टीवर निर्भर करतो की असंख्य अश्या जेनेटिक कोडच्या जाळ्यात एका विशिष्ट जेनेटिक मार्करचा शोध घेणे जो लोकांना एकमेकांपासून वेगळं सिद्ध करतो.
DNA टेस्टिंगचा इतिहास-
१९५० साली, अँना अँडरसनने स्वतःला रशियन राजघराण्याची वारस असल्याचा दावा केला होता. तिच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या DNA टेस्ट मध्ये तिचा राजघराण्याशी कवडीमोलाचा संबंध नव्हता हे सिद्ध झाले होते.
टिमोथी विल्सन नावाचा एक हत्यारा होता, जो पहिला अमेरिकन कैदी होता ज्याला DNA टेस्टच्या बळावर मृत्युदंड सुनावण्यात आला होता. डेव्हिड वास्क्वेज हा पहिला अमेरिकन माणूस होता ज्याला टिमोथी विल्सन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते त्याची निर्दोष मुक्तता DNA टेस्टिंगने १९१२ साली करण्यात आली होती.
बॉबी डनबर नावाचा चार वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. नंतर तो ८ महिन्यांनी सापडला. परंतु एका दुसऱ्या स्त्री ने तो तिचा मुलगा आहे अशी घोषणा केली. जेव्हा DNA टेस्टिंग करण्यात आली तेव्हा तो बॉबी डनबर नव्हता हे सिद्ध झाले. खऱ्या बॉबी डनबरचे काय झाले हे कोणालाच कळले नाही.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
*DNA टेस्टिंग कसे काम करते ?*
Parental, फॉरेन्सिक आणि जेनेटिक ह्या तीन प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात यात जैविक सॅम्पल्समधून जेनेटिक मार्करचा शोध घेतला जातो. कारण प्रत्येक पेशीत एकसमान DNA असतो. जो शरीराच्या कुठल्याही भागातून गोळा केला तरी सारखाच असतो. मग तो रक्तातून करतात अथवा त्वचेतून तो सारखाच असतो.
फॉरेन्सिक संशोधक तर अगदी पीडिताच्या नखात अडकलेल्या मासाच्या थोड्या बारीक तुकड्यातून DNA शोधून काढतात. संशयिताच्या रक्तातील DNA सुद्धा घेतला जातो. त्या DNA च्या हजारो प्रति निर्माण केल्या जातात. त्यासाठी PCR तंत्राचा वापर केला जातो. PCR म्हणजे Polymerase Chain Reaction.
*एका नैसर्गिक एन्झाईमच्या मदतीने PCR लाखो प्रति तयार करते. ज्यातून मोठ्या प्रमाणात DNA भेटतो ज्यातून संशोधन करणे सोपे होते.*
DNA कणांना विविध ठिकाणी काटून छाटून त्यातून जेनेटिक मार्कर बाजूला काढले जातात. मग त्यांचे कोडिंग केले जाते. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एखाद्या मनुष्याची संपूर्ण जेनेटिक प्रोफाइल तयार केली जाते. ती प्रोफाइल ज्या खऱ्या आरोपीच्या जेनेटिक प्रोफाइलशी समानता दाखवेल तो व्यक्ती गुन्हेगार असतो.
ह्याच मदतीने शरीरातील आजार, वंशावळ, होणाऱ्या बाळाचे आरोग्य या सर्व गोष्टींचा शोध घेतला जातो.
DNA टेस्ट किती यशस्वी होतात ?
DNA टेस्टची सफलता ही खूप महत्त्वाची असते. काहीवेळा DNA हे एकमेव एखाद्या व्यक्तीच गुन्ह्यातील निर्दोषत्व सिद्ध करण्याचं माध्यम असतं. त्यामुळे DNA टेस्ट १०० % सफल होणे अनिवार्य असते कारण त्या माणसाचं भवितव्य त्यावर अवलंबून असतं.
कधी कधी जेनेटिक मार्कर समान असण्याची शक्यता ही असते पण ती फारच अत्यल्प असते. तरी एकदम काटेकोर व सफल टेस्टिंग होणे गरजेचे असते. परंतु ही पद्धत प्रचंड खर्चिक असते.
अनेकवेळा मार्कर खूप मोठे असतात. त्यांना वेगळं करून योग्य ते संशोधन करण्यात बराच कालावधी जातो व पैसा सुद्धा जातो. दोन व्यक्तींची एकसमान जेनेटिक प्रोफाइल असेल याचे चान्स १ अब्जात १ इतके कमी असतात. त्यामुळे शक्यतो ही परिस्थिती उदभवत नसते.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------