🟣आकाशातून पडले मौल्यवान दगड, विकून अख्खं गाव झाले लखपती 🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - ३ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
आकाशातून उल्कावर्षाव, अंतरिक्षात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाचे भाग जमिनीवर पडल्याचे आपण ऐकले असेल. अनेकदा उल्कापिंडा सोबत पृथ्वीतलावर पडलेले दगड संशोधक संशोधनासाठी घेऊन जातात हे देखील पाहिले असेल. काही लोक आठवण म्हणून घरात सजवूनही ठेवतात. मात्र आकाशातून पडलेल्या दगड, धोंड्यामुळे अख्खं गाव लखपती झाल्याचे ऐकले काय? नाही ना. पण ब्राझीलमधील एका गावात असे घडले आहे. येथे उल्कावर्षाव दरम्यान पडलेल्या दगडांना लाखो रुपये किंमत मिळाली असून यातील एका तुकड्याची किंमत तर चक्क 19 लाख रुपये आहे.
ब्राझीलमधील सेंटो फिलोमेना गावात 19 ऑगस्टला उल्कावर्षाव झाला. लोक याला पैशांचाच पाऊस समजत आहे. कारण लोकांनी जमा केलेल्या या दगडांना लाखोंचा भाव मिळत आहे. आकाशातून पडलेले हे दगड दुर्मिळ असल्याने संशोधक याला खरेदी करत असून अनेक गावकऱ्यांनी याची विक्री करून लाखो रुपये कमावले आहेत. यातील 40 किलो वजनाच्या सर्वात मोठ्या तुकड्याला 26 हजार डॉलर (जवळपास 19 लाख रुपये) किंमत मिळाली आहे. या भागात छोटे-मोठे असे जवळपास 200 दगड आकाशातून पडले असून या तुकड्यांद्वारे ब्रह्मांडातील अनेक रहस्यांवरील पडदा उठेल असे संशोधकांनी सांगितले.
----------------------------------------
दरम्यान, आकाशातून पडलेला प्रत्येकच दगड एवढा मौल्यवान नसतो. उल्कावर्षाव दरम्यान आकाशातून जमिनीवर पडणाऱ्या दगडांपैकी फक्त 1 टक्के दगडांना लाखो रुपये मिळतात. सेंटो फिलोमेना गावात असेच दगड पडले असून हे उल्कापिंड 4.6 बिलियन वर्ष जुने असल्याचे बोलले जात आहे. दुर्मिळ असल्याने याला लाखोंचा भाव मिळत आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट दरम्यान, सेंटो फिलोमेना गावात राहणारे जवळपास 90 टक्के लोक शेती करून यावर आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र 19 ऑगस्टला गावकऱ्यांची लॉटरी लागली. आकाशातून पडलेले मौल्यवान दगड गोळा करून संपूर्ण गाव लखपती झाले आहे. गावातीलच रहिवासी एडिमार कोस्टा रॉड्रिग्स याने 7 सेंटीमीटरचा दगड विकून 97 हजार कमावले, तर एका गावकऱ्याने 2.8 किलो वजनाचा दगड विकून 14 लाख 63 हजार रुपये कमावले.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------