🟣 हवा नाही, पाणी नाही तरी चंद्राच्या पृष्ठभागाला गंज लागतेय🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - ६ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
चंद्रावर ना पाणी, ना हवा तरीही चंद्राच्या पृथ्वीनजीकच्या पृष्ठभागाला गंज लागल्याने शास्त्रज्ञ चकीत झाले आहेत. चंद्राच्या या पृष्ठभागावर ऑक्सिटाईज्ड आयर्न (लोह) म्हणजेच हेमॅटाइत हे खनिज आढळले आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट पृथ्वीवर हे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. लोहाचे ऑक्सिडेशन होण्यासाठी आवश्यक हवा तर चंद्रावर मुळीच नाहीय. शिवाय पाण्याचा अंशही गोठलेल्या स्वरूपात काही प्रमाणात मिळतो. मग लोहाच्या थराला गंज कसा चढतो याबाबत संशोधकांना कुतूहल निर्माण झाले आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
भारताने चांद्रयान -1 ने पाठवलेल्या चंद्राच्या छायाचित्रांवरून चंद्राचा एक भाग गंज लागल्यासारखा आढळून आला आहे. सूर्याच्या प्रखर किरणांनी चंद्रावर सतत हायड्रोजनचा वर्षाव होत असतो. अशा स्थितीत तेथे लोह कसे तयार होते याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करीत आहेत. मात्र या हेमॅटाइटचे अंश बर्फाचा थर असलेल्या भागातच आढळले आहेत.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------