पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो?

🟣पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो?🟣

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍     
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - ३ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस हे महत्त्वाचे अंग आहेत. लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला पुराव्यानिशी न्यायालयासमोर हजर करणे, इत्यादि जबाबदारी पोलिसांवर असते. समाजात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही अधिकार असतात. सर्वसाधारपणे पोलिसांना आपण त्यांच्या खाकी गणवेशावरुन ओळखतो. खाकी गणवेश ही पोलिसांची प्रमुख ओळख आहे. फरक इतकाच की काही राज्यात तो गणवेश किंचित फिकट तर काही राज्यात गडद खाकी रंगाचा असतो.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा
----------------------------------------
हिंदुस्थानात इंग्रजांच्या राजवटीत पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचा होता. परंतु दीर्घकाळ ड्युटी असल्यामुळे तो गणवेश लवकर मळत असे. या कारणाने त्रस्त होऊन पोलिसांनी आपल्या गणवेशाला वेगवेगळ्या रंगात वापरायला सुरुवात केली. परंतु यामुळे पोलीस वेगवेगळ्या गणवेशात दिसायला लागले. शेवटी वैतागून पोलिसांनी खाकी रंगाची डाय तयार केली. त्यासाठी चहाच्या पानांचे पाणी किंवा कॉटन फॅब्रिकचा रंग डाई म्हणून वापरला. ज्यामुळे त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी झाला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट खाक या शब्दाचा हिंदी अर्थ गाढ मातीचा रंग असा आहे. या खाकी रंगामुळे पोलिसांच्या वर्दीवर धूळ, डाग कमी दिसतील. सर हॅरी लुम्सडन यांनी 1847 मध्ये सर्वप्रथम खाकी रंगाचा गणवेश अधिकृत म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून खाकी रंगाचा गणवेश हिंदुस्थानी पोलिसात कार्यरत आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना ऋषी भूमकर यांनी ही माहिती दिली.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने