🟣PF अकाऊंटमधून घरबसल्या ऑनलाइन काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया🟣
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
❍ दिनांक - २ सप्टेंबर २०२०
----------------------------------------
रिटायरमेंटच्या नंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक चांगला रिटायरमेंट फंड असणे खुप आवश्यक आहे. पगारदार कर्मचार्यांसाठी पीएफची रक्कम त्यांच्या रिटायरमेंटनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते. परंतु, जीवनात अनेकदा अशी वेळ येते, जेव्हा पीएफचे पैसे काढण्याची गरज भासते. एखादा कर्मचारी घर खरेदी करणे, मुलांची लग्न किंवा शिक्षण, मेडिकल इमर्जन्सी इत्यादीसाठी आपल्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतो. पीएफ अकाऊंटमधून पैसे काढणे खूप सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून सुद्धा हे पैसे काढू शकता. जाणून घेवूयात हे पैसे काढण्याची प्रक्रिया काय आहे…
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
स्टेप 1. सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या युनिफाईड मेंबर पोर्टलवर आपला यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग-इन करावे लागेल.
स्टेप 2. आता तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिस टॅबमध्ये जावे लागेल आणि येथे क्लेम (फॉर्म 31, 19, 10सी अँड 10डी) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3. आता स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला तुमचा युएएनशी लिंक्ड बँक अकाऊंट नंबर नोंद करावा लागेल आणि व्हेरिफायवर क्लिक करावे लागेल.
स्टेप 4. यानंतर बँक खात्याच्या महितीसाठी दुजोरा दिल्यानंतर तुम्हाला ईपीएफओद्वारे सांगितलेले नियम आणि अटींना कन्फर्म करावे लागेल.
स्टेप 5. आता तुम्हाला प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 6. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर असलेल्या लिस्टमधून पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्याचे कारण निवडावे लागेल. या लिस्टमध्ये तुम्हाला तेच पर्याय दिसतील ज्यासाठी तुम्ही पात्र आहात.
स्टेप 7. आता तुम्हाला आपला पूर्ण पत्ता नोंदवावा लागेल आणि चेक किंवा बँक पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
स्टेप 8. आता तुम्हाला नियम आणि अटींना चेक करत गेट आधार ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
स्टेप 9. यांनतर तुम्हाला आधारच्या सोबत लिंक्ड आपल्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल.
स्टेप 10. हा ओटीपी नोंदवावा लागेल आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्याची तुमची विनंती पोर्टलवर नोंदली जाईल. तुम्ही पोर्टलवर जाऊन आपले क्लेम स्टेटस सुद्धा चेक करू शकता. क्लेम पास झाल्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------