🟢‘ही’ साडी नेसा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा! कशी? 🟢
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - १६ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
शीर्षक वाचून तुम्ही चक्रावला असाल ना? रोगप्रतिकारक शक्तिचा आणि साडीचा काय संबंध? पण हो. हो खरं आहे. साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या देशातील या राज्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी साडी बनत आहे. या साडीचं नाव आयुर्वस्त्र असं ठेवण्यात आलं आहे.
हिंदुस्थान म्हटला की, हातामागावरची साडी आणि आयुर्वेद हे त्याचे दोन अविभाज्य घटक म्हणून डोळ्यासमोर येतात. याच दोन घटकांना एकत्रित करून मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि इंदूर या दोन ठिकाणी इम्युनिटी बुस्टर साडी विणण्याचं काम सुरू आहे. मध्य प्रदेशच्या हातमाग आणि हस्तकला विभागाने या प्राचीन पद्धतीचा अवलंब करून हे साड्यांचं उत्पादन सुरू केलं आहे. प्राचीन काळात या पद्धतीचा वापर करून कपड्याची गुणवत्ता सुधारली जात असे. तीच पद्धत आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. नवभारत टाइम्सने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
या वृत्तानुसार, येथील हातमाग विभागातर्फे तयार होणाऱ्या या साड्यांसाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात आहे. जेणेकरून ही साडी वापरणाऱ्या महिलेच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे जंतू, बुरशी किंवा विषाणू राहू नयेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट या साडीला बनवण्यासाठी सर्वप्रथम लवंग, वेलची, काळीमिरी आणि अन्य काही मसाले तसेच औषधी वनस्पतींची पूड तयार केली जाते. ही पूड सुती कपड्यात बांधून त्याचे पोटीस दोन दिवस पाण्यात भिजवत ठेवलं जातं. त्यानंतर या पाण्याला मोठ्या चुलीवर उकळत ठेवून त्याच्या वाफेवर साडीच्या कपड्याला अनेक तास शिजवलं जातं. त्यामुळे या साडीच्या प्रत्येक ताण्याबाण्यावर औषधी अर्क पोहोचू शकतो.
काय आहेत या साड्यांचे फायदे?
या पद्धतीने तयार केलेल्या साड्या त्वचेचं रक्षण करतात. त्वचेची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. सध्याच्या कोरोना काळात या साड्या उपयुक्त ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच प्रवास करतेवेळी ही साडी परिधान केल्यास रोगाचे वाहक बनण्यापासून बचाव होऊ शकतो. तसंच चार ते पाच धुलाईपर्यंत या साडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीची क्षमता टिकून राहते, अशी माहितीही मिळत आहे. त्यासाठी साड्यांना अतिशय काळजीपूर्वक आणि शक्यतो रसायनविरहित पदार्थांनी धुवावे लागेल. यातील एका साडीची किंमत तीन ते पाच हजार इतकी आहे. सध्या या साड्या भोपाळ आणि इंदूर येथे उपलब्ध असून लवकरच देशभरातील दुकानांवर उपलब्ध होतील, अशी माहिती मिळत आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍