सरकारचा इशारा! ‘या’ नंबरवरुन कॉल आल्यास उचलू नका अन्यथा बँकेतील पैसे होतील गायब

🟣 सरकारचा इशारा! ‘या’ नंबरवरुन कॉल आल्यास उचलू नका अन्यथा बँकेतील पैसे होतील गायब🟣

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍      
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - १२ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
ऑनलाईन बँकिंग आणि फसवणूकीचे वाढते प्रकार लक्षात घेता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडलने CyberDost वरुन युजर्सला इशारा दिला आहे.
फेक कॉल विषयी सरकारने युजर्सना सतर्क केले आहे, या कॉलच्या मदतीने त्यांना लक्ष्य केले जात आहे. CyberDost ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून युजर्स सुरक्षित राहू शकतील.
फसवणूकीच्या हेतूसाठी बहुतेक कॉल +92 पासून सुरू होणार्‍या नंबरवरून येतात. अशा नंबरवरून सामान्य व्हॉईस कॉल व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉलही युजर्ससाठी केले जात आहेत. अशा कॉलचा हेतू युजर्सची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरणे हा आहे
कॉल करणारा आरोपी युजर्सला बोलण्यामध्ये गुंतवून माहिती चोरतो. या व्यतिरिक्त बर्‍याच युजर्सकडे +01 पासून सुरू होणार्‍या नंबरवरुन कॉल देखील आले आहेत.
05
सरकारने युजर्सला अशा कॉलविषयी सावधगिरी बाळगा आणि फोनवर कोणाबरोबरही कधीही बँकींग डिटेल्स तपशील शेअर करू नका असं आवाहन केले आहे.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
कॉल दरम्यान, लोकांच्या बँक खाते क्रमांकापासून डेबिट कार्डच्या तपशीलांपर्यंतची माहिती चोरी केली जाते. यासाठी त्यांना लॉटरी किंवा लकी ड्रॉमध्ये नाव जिंकण्यासारखे आमिष दाखविले जाते आणि त्या बदल्यात बँकिंग तपशील मागितला जातो
जिंकलेले पैसे तुमच्या खात्यावर पाठविले जातील. फसवणूक करण्यासाठी आरोपी एखाद्या मोठ्या कंपनीचे नाव घेऊन त्याची सेवा खरी आहे असा दावा युजर्सला करतो. जेणेकरून तो सहजपणे त्याच्या जाळ्यात अडकेल.
कॉलरच्या वतीने क्यूआर कोड किंवा बार कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. चुकूनही असे कोड स्कॅन करु नका.
फसवणूक करणाऱ्या टोळीकडून युजर्सला कॉल वेगवेगळ्या नंबरवरुन देखील करु शकतात.
सरकारकडून अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. जर तुम्हालाही अशाप्रकारे कॉल्स आले तर उचलू नका, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने