🛵सायकलच्या किंमतीत मिळतेय ही इलेक्ट्रिक दुचाकी, लायसन्सचीही गरज नाही; 🛵
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - १६ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
स्व त्यांच्यासाठी ही दुचाकी अत्यंत फायदेशीर असल्याचे कंपनीने म्हंटले.स्त फोन आणि स्वस्त एलईडी टीव्हीनंतर आता डिटेल इंडियाने (Detel India) सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी हिंदुस्थानच्या बाजारात लॉन्च केली आहे. या दुचाकीचे नाव डिटेल इझी (Detel Easy) असे ठेवण्यात आले असून जगातील ही सर्वात जास्त परवडणारी इलेक्ट्रिक दुचाकी असल्याचा दावा कंपनीचा आहे. तसेच या दुचाकीला प्रति किलोमीटर खर्च फक्त 20 पैसे येत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट ही इलेक्ट्रिक दुचाकी पांढऱ्या, लाल आणि काळ्या अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने याची किंमत 19,999 रुपये ठेवली आहे. ही दुचाकी फक्त खरेदी करण्यासाठीच नाही तर चालवण्यासाठी देखील बजेटमध्ये आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही दुचाकी चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसेन्सची किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, असे कंपनीने म्हटले आहे. ज्या लोकांना रोज कमी अंतरावर कामावर किंवा दुकानावर जावे लागते
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍*
----------------------------------------
डिटेल इझी (Detel Easy) ही दुचाकी एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटर प्रवास करू शकते. तसेच ताशी 25 किलोमीटर एवढा या दुचाकीचा वेग असून फुल्ल चार्ज होण्यासाठी याला 7 ते 8 तास लागतात. या दुचाकीचे वजन 56 किलो असून सोबत 3 वर्षांची वॉरंटी देखील कंपनी देत आहे. तसेच दुचाकीच्या मोटार, कंट्रोलर आणि चार्जरची एक वर्षाची वॉरंटी कंपनी आपल्याला देते. सोबत हेल्मेट मोफत मिळत असून दोन लोक यावरून आरामात प्रवास करू शकतात.
याआधी या कंपनीने 299 रुपयात फीचर फोन आज 3999 रुपयात एलईडी टीव्ही बाजारात लॉन्च केला होता. 2017 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली असून जर तुम्ही इलेक्ट्रिक दुचाकी ऑनलाईन खरेदी केल्यास 2500 रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावे लागतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍