नव्या तंत्रज्ञानाने कृत्रिमगर्भधारणा यशस्वी

नव्या तंत्रज्ञानाने कृत्रिमगर्भधारणा यशस्वी

-
अनेक ठिकाणी उपचार घेऊन तब्बल आठवेळा गर्भधारणा न झालेल्या महिलेल्या नव्या पद्धतीने कृत्रिम गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. पट्टेद फर्टीलिटी अँड रिसर्च सेंटरच्या संचालिका तसेच आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. शोभना पट्टेद यांनी हे यश मिळवले आहे. उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच बेळगावात झाला आहे.
गोकाक येथील महिलेचा 14 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण, त्यांना मूल झाले नव्हते. अनेक ठिकाणी त्यांनी तपासणी केली. आठवेळा गर्भधारणेचा प्रयत्न झाला. यामध्ये तीनवेळा टेस्ट ट्यूब बेबीसाठीही प्रयत्न झाला होता. पण, सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यांनी पट्टेद फर्टीलिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये तपासणी करुन घेतली. त्यांची संपूर्ण तपासणी करुन त्यांना गर्भधारणेत होणारी नेमकी समस्या शोधण्यात आली. प्रीइम्लांटेशन जेनेटिक टेस्टींग केले. या अंतर्गत अलाईस आणि एम्मा या दोन चाचण्या केल्यानंतर कृत्रिम गर्भधारणेची प्रक्रिया पार पाडण्यात आली. नऊ महिन्यांनी सदर महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन 3.8 किलो आहे. माता आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने