⭕QR कोडद्वारे ट्रांजक्शन करणार्यांसाठी खुशखबर ! लवकरच मिळेल अनेक मोठ्या ऑफर्सचा फायदा, RBI नं दिले संकेत⭕
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - २४ जुलै २०२०
----------------------------------------
लवकरच क्यूआर कोडद्वारे होणार्या ट्रांजक्शनवर आपल्याला अनेक प्रकारच्या ऑफर आणि सूट मिळू शकते. रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने अशा कोडद्वारे होणार्या आर्थिक व्यवहारास चालना देण्यासाठी इन्सेंटिव्ह देण्याचे संकेत दिले आहेत. क्यूआर कोड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कोड एक बार-कोड असतो, ज्यामध्ये एखादे प्रॉडक्ट, यूजर इत्यादीशी संबंधित पूर्ण माहिती असते. जी स्कॅन केल्यानंतर वाचता येऊ शकते.
आयआयटी बॉम्बेचे प्रोफेसर इमेरिटस, डीबी पाठक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन रिझर्व्ह बँकेच्या समितीने व्यापार्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे स्वीकारल्यास टॅक्स इन्सेटिव्ह देण्याचा सल्लासुद्धा दिला आहे. क्यूआर कोडबाबत तयार करण्यात रिपोर्टनुसार व्यापारी आणि ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलतीचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे देशात ग्राहकांमध्ये क्यूआर कोड आधारित व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे व्यापाराला चालना देता येईल.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
समितीच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, क्यू आर कोड खुप स्वस्त आणि प्रभावी माध्यम आहे, आणि वापरणार्यांसाठी सुद्धा खुप सोयीस्कर आहे. रिझर्व्ह बँकेने या रिपोर्टवर सुद्धा सर्व पक्षांकडून 10 ऑगस्टपर्यंत सूचना मागवल्या आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट क्यूआर कोडचे डिझाईन प्रॉडक्टचे ट्रॅकिंग करणे, प्रॉडक्टची माहिती ठेवणे, डॉक्यूमेंट्स मॅनेज करणे किंवा मार्केटिंगच्या गरजांसाठी करण्यात आले आहे. माहिती जमा करण्याची क्षमता आणि वापरण्यातील वेगामुळे या कोडचा वापर खुप वाढला आहे. डिजिटल ट्रांजक्शनमध्ये कोडच्या मदतीने वेगाने आणि सुरक्षित व्यवहार करणे शक्य झाले आहे. यामुळे अशा ट्रांजक्शनची संख्या वाढावी आणि बँकांवरील छोट्या ट्रांजक्शनचा दबाव कमी व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9911714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
*_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍