आश्चर्य !!! ह्या मंदिरात प्रवेश करायला लोक घाबरतात!

🟢 आश्चर्य !!! ह्या मंदिरात प्रवेश करायला लोक घाबरतात!🟢

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍  
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - 28 जुलै २०२०
----------------------------------------
मंदिर म्हणजे एक असे ठिकाण जिथे लोक आपल्या जीवनातील समस्या देवापुढे मांडून त्या दूर कराव्यात म्हणून देवाला प्रार्थना करतात. मंदिर हे एक असे ठिकाण आहे जिथे मनुष्याला सुख, शांती आणि समाधान मिळते.
रोजच्या कटकटींना कंटाळून लोक मन शांत करण्यासाठी मंदिरात जातात, पण याच मंदिराला लोक घाबरू लागले तर काय होईल?
विश्वास बसत नाही ना….पण विश्वास ठेवा कारण भारतात एक असे एक मंदिर आहे जिथे जाण्यासाठी लोक घाबरतात.
उत्तर भारतात हिमाचल प्रदेश राज्यात चंबा प्रांतात भारमोर गावात एक मंदिर आहे जिथे प्रवेश करण्यास भाविक घाबरतात.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   *❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा
----------------------------------------
हिंदू पुराणानुसार असे मानले जाते की, हे मंदिर यमाचे निवास्थान आहे. यम म्हणजे मृत्यूचा देवता. याच कारणामुळे लोक या मंदिराकडे जाण्यास घाबरतात.
भारतीय धर्मानुसार यमाची भेट कायमच भितीदायक मानली जाते. त्यामुळे स्वतःहून यमाचे दर्शन घेण्यासाठी कोणताही भारतीय स्वेच्छेने तयार नसतो.
धर्मेश्वर महादेव मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून सुद्धा हे मंदिर ओळखले जाते.
या भागातील ८४ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. येथील स्थानिक लोक ह्या ठिकाणाला ‘डोंग-पोडी’ असे देखील म्हणतात. डोंग-पोडी म्हणजे दोन व अडीच पायऱ्या असा होतो.
प्राचीन नोंदीनुसार या मंदिराला चार अदृश्य प्रवेशद्वार आहेत, प्रत्येक प्रवेशद्वार वेगवेगळ्या धातूंनी बनवण्यात आले आहे.
चार वेगवेगळे दरवाजे बनवण्यासाठी सोने, चांदी, लोखंड आणि तांबे वापरण्यात आले असून पुरातन धार्मिक ग्रंथ गरुड पुराणामध्ये या दरवाज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट या भागाला भेट देणारे लोक या मंदिराच्या बाजूने निघून जातात परंतु मंदिरात जात नाहीत. ते मंदिरात जाण्यास घाबरतात.
ज्या मनुष्याला या मंदिराला नमस्कार करायचा असेल तर तो मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करतो, पण आत जात नाही.
या मंदिरामध्ये यमदेवाचा सहकारी असणाऱ्या चित्रगुप्तला सुद्धा मानाचे विशेष स्थान देण्यात आले आहे.
अशी ही मान्यता आहे की, जो कोणी हिंदू मरतो त्याचा आत्मा या मंदिरात चित्रगुप्तला भेटण्यासाठी येतो. चित्रगुप्त त्याचा चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा मांडतो.
त्या माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या नोंदीनुसार यमदेव ठरवतो की त्याचा आत्मा त्या अदृश्य चार दरवाज्यांपैकी कोणत्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश करणार.
असे हे मंदिर सध्या खूप चर्चेत आहे. कधी या भागात फिरण्यास गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9911714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने