श्री शारंगधर बालाजी.


श्री शारंगधर बालाजी.

औरंगाबादपासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे. मोठ्या काळ्या पाषाणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले आहेत. मूर्ती मध्ययुगीन आहे.

श्री शारंगधर बालाजी.

तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ भिते पाटील, अॅड. मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता.

मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.

इ.स. १८८८ मध्ये पोलिस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीत खोदकाम करताना २० फूट लांब फूट रुंद लोखंडी पेटीत ही मूर्ती होती. मूर्तीवर चंदनाचा भुसा होता. सोबत दोन ताम्रपट होते. त्यावर मूर्तीचा इतिहास लिहिलेला होता. तो दिवस होता नागदीपावलीचा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्तावर डिसेंबर १८८८ ला मूर्ती सापडल्याने तोच दिवस गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.

असा आहे शारंगधर बालाजी.

रेखीव मूर्ती, छाती पोट गोमुखाकृती. 

मूर्ती चतुर्भुज असून हातात गदा, चक्र, पद्म आहे. 

पायाजवळ जय-विजय, लक्ष्मी-कुबेर भूदेवी. 

हातातील शस्त्रांत धनुष्य नाही, पण मूर्ती भोवती प्रभावळीत विष्णूंचे दहा अवतार कोरले आहेत. 

डोक्यावर शारंग नावाची धनुष्य धारण केलेली विष्णूंची मूर्ती कोरली आहे. म्हणून हा शारंगधर. 

ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.

जालन्यापासून वाशीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे।  आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे। मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे. शारंगधर म्हणून नाव आहे

 lllllllll

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने