उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो
लसूण अन्नाचा स्वाद वाढवतो पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आर्युवेदात देखील लसणीचे महत्त्व सांगितले आहे. कॉलेस्ट्राईल, रक्त दाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लणूस उपयोगी आहे. तर कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. लसणीच्या गुणांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील पण लसणूचा आखणी एक फायदा आहे ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.
आजही अनेक लोक लसणीची किमान एक तरी पाकळी उशाशी घेऊन झोपतात.रात्री झोपताना लसणाची एक पाकळी उशीखाली ठेवली तर अनेक आरोग्य फायदे होतात. लसणातील वोलेटाइल ऑइलचा वास नाकातून शरीरात गेल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात.तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणे आहे. लसणीच्या इतर गुणांपैकी आणखी एक गुण असा आहे कि लसणीत रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणीचा कांदा घराच्या कोप-यात ठेवला जायचा. असे केल्याने हवेतील बॅक्टेरिया नाहिसे व्हायचे. तर लसूण उशीखाली घेऊन झोपण्यामागेही अनेक कारणे तसेच श्रद्धा आहेत. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. तर अनेक देशांत लसूण उशाशी ठेवून झोपण्यामागे अनेक श्रद्धा आहे. लसूण वाईट प्रवृत्ती किंवा वाईट स्वप्नांपासून दूर ठेवते अशी श्रद्धा अनेकांची आहे.