मुख्यपृष्ठआरोग्य आपल्याला स्वप्न का पडतात ? byVikram dhanawade •जानेवारी ०३, २०२३ 0 आपल्याला स्वप्न का पडतात ? आपल्याला स्वप्न का पडतात? आपण ती का विसरतो.आपल्याला स्वप्न का आठवत नाहीत कारण आपल्या झोपेचे विविध टप्पे असतात.ज्यामध्ये एक रॅपिड आय मूव्हमेंट नावाचा टप्पा असतो. यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. याच कालावधीत स्वप्न पडतात. या संबंधात अनेक शास्त्रीय संशोधन देखील झालेले आहे झोपेत असताना देखील आपला मेंदु सक्रिय असतो. मात्र त्यावेळी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्न का आठवत नाही स्वप्न बघतेवेळी लक्षात ठेवणारं ब्रेन इलेक्ट्रिक आणि अॅक्टीव्हीटी ब्रेन केमिकल नॉरपेनेफ्रिन खूप कमी सक्रिय असतो त्यामुळे स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. जे स्वप्न बघून आपण त्वरित झोपेतून उठतो ती स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला रात्री पडणारं स्वप्न लक्षात ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर बेडवरून न उठता स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला तुमचे स्वप्न आठवेल. Tags: आरोग्य आवश्यक माहिती Facebook Twitter