१९८३ साली माधुरीची सिरीयल तयार होती पण दूरदर्शनने तिला चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट केलं….

 १९८३ साली माधुरीची सिरीयल तयार होती पण दूरदर्शनने तिला चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट केलं….

१९८३ साली माधुरीची सिरीयल तयार होती पण दूरदर्शनने तिला चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट केलं…

बॉलिवूडमध्ये बराच काळ स्ट्रगल केल्यानंतर एखादं काम मिळतं आणि त्याचं ते काम वाजलं कि पुढे अनेक कामं मिळून तो हिरो किंवा हिरोईन पुढे इंडस्ट्रीमध्ये नाव कमावतात. एखाद्याचं पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन होतं आणि काहींना सतत रिजेक्शन मिळाल्याने ते पुन्हा बॉलिवूडच्या नादी लागत नाही. आजचा किस्सा भारी इंटरेस्टिंग आहे.

माधुरी दीक्षित माहिती नसलेला भारतातला एकही तरुण नसेल. माधुरी दीक्षितचे सिनेमे, गाणी , अदाकारी, डान्स सगळ्यांचेच चाहते आहेत. एकेकाळी बॉलिवूडमध्ये नामांकित अभिनेत्रींना मागे टाकून बॉलिवूडची क्वीन म्हणून ती ओळखली जात होती. इतकं यश आणि प्रसिद्धी मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतंच. माधुरी दीक्षितलासुद्धा दूरदर्शनने रिजेक्ट केलं होतं. याबद्दलचा आजचा किस्सा.

हि गोष्ट आहे १९८३ सालची. माधुरी त्याकाळी नवखी होती आणि बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होती. या काळात माधुरीला एक टीव्ही सिरीयलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरियलचं नाव होत बॉंबे मेरी हे.

हि सिरीयल दूरदर्शनवर टेलिकास्ट होणार होती.

पण शूटिंग पूर्ण होऊनही हि मालिका दूरदर्शनवर दाखवली गेली नाही.

इतकंच नाही तर या सिरियलची पायलट एपिसोडही रेडी झाले होते पण दूरदर्शनने हि मालिकाच रिजेक्ट केली.

या मालिकेत माधुरी दीक्षित आणि बेंजामिन गिलानी हे मध्यवर्ती भूमिकेत होते. बेंजामिन गिलानी हे त्याकाळी बऱ्याच टीव्ही शो मध्ये काम करून आलेले होते आणि त्यामुळे ते बऱ्याच लोकांना माहिती होते मात्र माधुरी नवीन होती.

या मालिकेची गोष्ट होती कि माधुरी यात गृहिणी असते आणि तिचा नवरा हा स्क्रिप्ट रायटर असतो, जेव्हा दोघांचं लग्न होत तेव्हा ते एका चाळीत शिफ्ट होतात. लोकांना जेव्हा तिचा नवरा स्क्रिप्ट रायटर आहे असं कळत तेव्हा लोकांची झुंबड उडते आणि ते विचारतात कि चित्रपटतात हिरो कोण आहे.त्यावेळी दूरदर्शनला याबद्दल जाब विचारण्यात आला तेव्हा दूरदर्शन अधिकारी म्हणाले कि,

चित्रपटातील पात्रं हे प्रमोट करता येतील इतके चांगले नाहीत, सगळी नवीन लोकं मालिकेत दिसत असल्याने टेलिकास्ट केल्यावर यातून पैसे मिळतील का, लोकांना आवडेल का असे अनेक प्रश्न उभे राहतात.

म्हणून दूरदर्शनने हि मालिका टेलिकास्ट होऊ दिली नाही. यामुळे टीव्ही वर पदार्पण करण्याचं राहून गेलं.

खरंतर याचा परिणाम माधुरीवर झाला नाही कारण वर्षभरानंतर तिला १९८४ साली अबोध नावाचा चित्रपट मिळाला.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. हाच चित्रपट नाही तर एकूण या काळात आलेले तिचे बहुतेक चित्रपट हे सपशेल बॉक्स ऑफिसवर पडले.

प्रदीर्घ काळानंतर मात्र माधुरीला यश मिळालंच. १९८८ साली माधुरीने तेजाब या चित्रपटातून जोरदार कमबॅक केला आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपला दर्जा दाखवून दिला. तेजाब चित्रपटानंतर मात्र माधुरीसाठी निर्माते उंब्रे झिजवू लागले. अनेक चित्रपटांच्या ऑफर्स तिला येऊ लागल्या. तेजाब नंतर सलग सात चित्रपट माधुरीने सुपर हिट दिले. 

या चित्रपटांमध्ये राम लखन, त्रिदेव, कृष्ण कन्हैय्या, दिल, थानेदार, साजन आणि बेटा यांचा समावेश होता. एकेकाळी दूरदर्शनने रिजेक्ट केलेली घटना आणि सलग सात चित्रपट हिट देऊन माधुरीने रिजेक्शन मधून यशस्वी कस होता येतं हे दाखवून दिलं.

पुढे चित्रपटांबरोबरचं माधुरीने टीव्ही शो सुद्धा केले, त्यात २००२ साली मेट्रोमोनीयल शो कही ना कही केला. त्याशिवाय झलक दिख ला जा या डान्स रियालिटी शो मध्ये ती जजच्या भूमिकेत दिसून आली होती. दूरदर्शनचं रिजेक्शन ते आजच्या काळातील यशस्वी अभिनेत्री असा माधुरी दीक्षितचा सुंदर प्रवास आहे.

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने