माणसाला अमर होणं शक्य! अमेरिकन कपंनीचा दावा
प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते की त्याने अमर व्हाव. मात्र हे अशक्य आहे हेही सर्वांना माहित असतं. पण अमरत्व मिळणं शक्य आहे का? अमेरिकेतील एका कंपनीचं असं म्हणनं आहे की हे शक्य आहे. आम्ही हे करुन दाखवू शकतो...कसं? वाचा पुढे...
अमेरिकेतल्या एका कंपनीने आपण कोणालाही अमर करू शकतो असा दावा केला आहे. एवढंच नाही, तर मृत्यूची वेळ येऊन गेल्यानंतर दर वर्षी तुम्ही केवळ ५२ हजार रुपयांमध्ये जिवंत राहू शकता असंही या कंपनीने म्हटलं आहे.
अमेरिकेतल्या स्कॉट्सडेल अॅरिझोनामध्ये असणाऱ्या अल्कोअर क्रायोनिक्स या कंपनीने हा दावा केला आहे.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विशिष्ट प्रकिया करून त्याला जिवंत करता येऊ शकतं असं या कंपनीचं म्हणणं आहे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या मृतदेहाला आणि मेंदूला लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवण्यात येईलयामुळे शरीरातले अवयव आणि मेंदू यांना कोणतंही नुकसान पोहोचणार नाही आणि ते बराच काळ सुस्थितीत राहतील. यानंतर व्यक्तीच्या मेंदूला एका निरोगी शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करण्यात येईल.
हा मेंदू पुन्हा सुरू झाल्यामुळे, ती व्यक्तीही जिवंत होईल. हीच प्रक्रिया पुढे पुन्हा पुन्हा करून ती व्यक्ती अमर होऊ शकते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मृत शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे दोन लाखडॉलर्स, म्हणजेच सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे.
ही प्रक्रिया केल्यानंतर दर वर्षीचा खर्च 705 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 52 हजार रुपये असणार आहे. न्यूरो-रोगी असणाऱ्यांसाठी हा खर्च 80 हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे साठ लाख रुपये असणार आहे.
या कंपनीचे सीईओ मॅक्स मोर हे ब्रिटिश आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 80 हजार डॉलर्स किंवा दोन लाख डॉलर्स ही किंमत तुलनेने अगदीच स्वस्त आहे.