या मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू, जाणून घ्या नरकाच्या दरवाजाचे रहस्य
==========================
*_〽️माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव〽️_*
*दि. ३ ऑगष्ट २०२१*
जगात अनेक मंदिर प्रसिद्ध आहेत. काही मंदिरं त्यांच्या इतिहासासाठी तर काही मंदिरं स्थापत्यकला शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही मंदिरं त्यांच्या गर्भात असलेल्या खजिना आणि पुराणकथांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु जगात असेही एक मंदिर आहे जिथे गेल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मनुष्यच नव्हे तर कुठल्याही प्राणिमात्राने या मंदिरात प्रवेश केल्यास त्याचा मृत्यू होतो. म्हणून या मंदिराला नरकाचे द्वार असेही म्हटले जाते.
तुर्की देशात प्लुटो देवाचे प्राची मंदिर आहे. या मंदिरात कोणीही प्रवेश केल्यास त्याचा मॄत्यू ओढवले. याबद्दल कोरा या वेबसाईटवर संग्राम पोखले यांनी माहिती दिली आहे.
दक्षिण तुर्कीच्या हिरापोलीस शहरातील प्लुटो देवाचे प्राचीन मंदिर आहे. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या मंदिराच्या आत इतका अंधार आहे की समोरचे काहीच दिसत नाही. या मंदिरात जी कोणी व्यक्ती जाते, तीचा मृत्यु होतो. एवढेच नव्हे तर मंदिराजवळ असलेले पशु पक्षी यांचा सुद्धा मृत्यु झालेला आहे. म्हणुनच या मंदीराला नरकाचा दरवाजा असेही म्हणतात.
अनेक संशोधक व वैज्ञानिक यांनी आजपर्यंत या मंदिरातील मृत्यु होण्याचे नेमके रहस्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा संशोधक व वैज्ञानिक त्या गावात जातात आणी तेथील लोकांना सांगतात की, आम्ही या मंदिरातील मृत्यु होण्याचे रहस्य शोधण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा स्थानिक माणसे त्यांना पिंजऱ्यात कैद केलेले पक्षी देऊन मंदिराजवळ ठेवायला सांगायचे. मंदिराजवळ तो पक्षी असलेला पिंजरा ठेवल्यानंतर काही मिनिटांतच त्या पक्ष्याचा मृत्यु होत होता.
आपल्या डोळ्यासमोर झालेला त्या पक्ष्याचा मृत्यु पाहून संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने मंदिरात न जाता हे रहस्य जाणुन घेण्याचा नाद सोडून घरी परत जायचे.
मात्र 2018 मध्ये या मंदिराचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश आले. या मंदिरात एवढा अंधार आणी धुर का आहे? याचे उत्तर संशोधक व वैज्ञानिक यांना मिळाले.
मंदिराच्या आत असलेल्या गुहेतुन मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वायु निघतो., तसेच इतरही काही विषारी वायु या गुहेतुन बाहेर पडत आहेत. संशोधक व वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार एखादी व्यक्ती किंवा पशु पक्षी जिथे जाईल त्या वातावरणात 10 % कार्बनडाय ऑक्साईड वायु असला तर ती व्यक्ती, पशु पक्षी अर्ध्या तासात मृत्यु पावतात. आणि पृथ्वीच्या वातावरणात हा कार्बन डाय ऑक्साईड वायु 0.039 % इतका आहे पण या मंदिरात व मंदिराच्या परिसरात त्याचे प्रमाण 91% इतके आहे. म्हणून कुठला प्राणी किंवा व्यक्ती या मंदिरात गेल्यास त्याचा मृत्यू होतो असे निष्पण्ण झाले आहे.
==========================
*माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव*
==========================