Google Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात? जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम

Google Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात? जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम




==========================
〽️माहिती सेवा ग्रुप 
   दि. ११  जुलै २०२१

कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. अनेक जण गुगल पे फोन पे , पेटीएम  आणि इतर Apps चा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करतात. परंतु UPI मोडमध्ये केल्या जाणाऱ्या पेमेंट्ससाठी काही मर्यादा आहेत. याबाबत अनेक युजर्सला माहिती नसते. अशात आपण ज्या यूपीआयचा वापर करत आहोत, त्याची ट्रान्सफर लिमिट माहित असणं गरजेचं आहे. जर युजरने खालीलपैकी कोणतंही काम केल्यास, तो त्याचं दररोजचं ट्रान्सफर लिमिट पूर्ण करतो.
सर्व UPI Apps द्वारे एक लाख रुपयांहून अधिक पैसे पाठवण्याचा प्रयत्न केल्यास हे लिमिट पूर्ण होतं. जर एखाद्याने 2000 रुपयांहून अधिकची रिक्वेस्ट केल्यासही ट्रान्सफर लिमिट पूर्ण होऊ शकते. युजरच्या बँक अकाउंटनुसार गुगल पेसाठीचं लिमिट वेगवेगळंही असू शकतं. काही वेळा अधिक पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागू शकते.
ट्रान्झेक्शनमध्ये अडथळे आल्यास -
युजरला फ्रॉडपासून  वाचवण्यासाठी काही ट्रान्झेक्शन रिव्ह्यू करण्यासाठी रोखले जाऊ शकतात. जर युजरने दररोजचं लिमिट एक लाख पूर्ण केलं नसेल आणि तरीही ट्रान्झेक्शनमध्ये समस्या येत असल्यास युजर गुगल पे सपोर्टशी  संपर्क करू शकतात. एक रुपयाहून कमी ट्रान्झेक्शन करता येणार नाही आणि सतत एरर मेसेज दिसत राहील.
काही बँक दररोजचं UPI ट्रान्झेक्शन लिमिट एक लाखाहून कमीदेखील ठेऊ शकतात. अशावेळी बँकेत जाऊन UPI ट्रान्झेक्शन डेली लिमिटबाबत माहिती घेणं गरजेचं आहे.
==========================
माहिती सेवा ग्रुप 
==========================
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने