या शंकराच्या मंदिरावर दर १२ वर्षानी वीज पडते

 या शंकराच्या मंदिरावर दर १२ वर्षानी वीज पडते 

________

माहिती सेवा ग्रूप 

________

हिमाचलप्रदेश मध्ये असे शंकराचे मंदिर आहे. जिथे दर 12 वर्षांनी वीज पडते. भगवान शंकराचे हे रहस्यमय मंदिर आहे. कुल्लू शहरातील व्यास आणि पार्वती नदीच्या संगमाजवळ असणाऱ्या पर्वतावर हे मंदिर असून येथे दर 12 वर्षानी वीज पडते मात्र मंदिराला यत्किंचितही क्षती पोहोचत नाही. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिले आहे.l

पौराणिक कथा आणि मान्यतेनुसार शंकराचे हे मंदिर ज्या घाटात स्थित आहे ते सापाचे रूप आहे. भगवान शंकराने या सापाचा वध केला होता. याच मंदिरावर दर 12 वर्षांनी आकाशातून वीज पडते. वीज पडल्याने मंदिरातील शिवलिंग खंडित होते आणि पुजारी यावर दह्याचा अभिषेक घालून दाह शांत करतात.

काय आहे पौराणिक कथा ?

पौराणिक कथेनुसार या भागात कुलांत नावाचा एक राक्षस राहात होता. हा राक्षस सापाचे रूप धारण करून लोकांना त्रास द्यायचा. एकदा कुलांत राक्षसाने अजगराचे रूप धारण करून मथान गावाजवळून वाहणाऱ्या व्यास नदीत मांड ठोकून बसला. यामुळे नदीचे पाणी रोखले गेले आणि गावात पाणी शिरू लागले. हे पाहून भगवान शंकराला राग आला. भगवान शंकराने माया रचत त्याला शेपटीला आग लागल्याचे सांगितले आणि तो वळताच त्याचा वध केला. पुढे राक्षसाचे मृत शरीर डोंगररुपी झाले. कुलांतच्या वधानंतर भगवान शंकराने इंद्रदेवाला इथे दर 12 वर्षांनी वीज पाडण्यास सांगितले 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने