या गावात रडायला बंदी आहे,एवढेच काय,मांसाहार व मद्यपान करण्यास हि बंदी
______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वाच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल.तर "श्रावण" या नावाचे एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या गावाला लागूनच आहे एक छोटीशी तळेवाडी...गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत क्षेत्रपाल देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाण आहे.श्री देव क्षेत्रपाल देवाचे मंदिर म्हणजे येथील लोकांचे श्रद्धास्थान आहे. देवाला जे अमान्य ते गावातील लोक कधीच करत नाहीत. येथे वर्षानुवर्षे पूर्वजांनी पाळलेल्या रूढी-परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.या गावातील क्षेत्रपालाच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही.तसेच या मंदिराच्या परिसरात शिकारीलाही बंदी आहे. शिवाय या भागात कोणत्याही जीवाचे रक्त सांडलेले क्षेत्रपाल देवाला मान्य नाही.संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात करायचा अशी येथील प्रथा आहे.यामुळे गावात संध्याकाळ नंतर कोणी मयत झाले तरी,कोणी रडत नाही. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे.यामुळे बरेच जण शाकाहारी आहेत.मंदिर परिसरात दारू पिऊन येणे, मांस खाऊन येणे देवाला पसंत नाही. येथे खूप काळजी घ्यावी लागते. मंदिराच्या मध्ये क्षेत्रपाल देवाचे पाषाण आहे.बाजुला शिळा आहेत.याबरोबर आणखि एक आश्चर्य म्हणजे,श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. पावसाळ्यात कितीही मोठा पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे.त्याच वाडीच्या सड्यावर आहे वाघबाव म्हणजेच एक गुहा.. आणि तिकडेच पुढे एक गणपती च मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला त्या मंदिर समोर खूप सारे दगडांनी बांधलेले दीपस्तंभ पाहायला मिळतात.खरेतर कोकण हा भौगोलिकदृष्टय़ा डोंगर-नद्या-नाले- टेकडय़ा यांनी व्यापलेला आहे. श्रावणामध्ये नसíगक सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते.अशा या निसर्ग रम्य "श्रावण" गावी भेट दयायलाच हवी.आणि श्रावण महिन्यात भेट दिली तर दुधात साखर.