विचित्र आड़नावे
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
फेसबुक लिंक https://bit.ly/337DNaU
रामगिरीवार, रामगुडे, रामजोशी, रामटेककर, रामटेके, रामढोक, रामतीर्थकर, रामद्वार, रामदंडी, रामदंडे, रामदास, रामदासी, रामदेरकर, रामधरणे, रामनवमीवाले, रामनाथकर, रामनामे, रामपर्तीवार, रामपूरकर, रामपुरे,रामरक्षे, रामराजकर, रामराजे, रामराव, रामले, रामाडे, रामाणी, रामाणे, रामायणे, रामिष्टे, रामीण, रामे, रामेकर, रामुगडे, रामेके आणि रामोशी अशी 'राम' असलेली आडनावे माझ्या संग्रही 'मराठी आडनाव कोशात' आहेत. यापैकी बरीचशी आडनावे कशी रूढ झाली असावीत याचा अंदाज चटकन बांधता येतो.♍आडनावांच्याशेवटी 'गडे' किंवा 'गुडे' असे शब्द असलेली अनेक आडनावे आहेत. उदा. अदगडे, अरगडे, अंबागडे,उबगडे, घाटुगडे, तानुगडे, आटुगडे, गुईगडे, रेवगडे, देवगडे,भिवगडे, सागडे, लेंगडे, कोलंगडे,म्हारुगडे वगैरे. रामुगडे हे याच गटातले पण 'राम' असलेले आडनाव असावे. झगडे आणि लुगडेहेही याच गटात बसतात असे वाटते, पण तसे नसावे. कानगुडे, धायगुडे, काळगुडे, भरमगुडे,निरगुडे, सालगुडे, ससगुडे, चांदगुडे, सुरगुडे, अजगुडे, तरगुडे, किर्तगुडे, बामगुडेवगैरे आडनावांच्या गटात 'रामगुडे' बसतात.♍रामाचा कट्टर शत्रू म्हणजे रावण. रामाला मराठी आडनावात स्थान मिळाले मग रावणालाच का नसावे? रावण, रावणकर, रावणगावकर,रावणंग आणि रावणंगे अशी ‘रावण’ धारी आडनावे माझ्या संग्रही आहेत♍े.अस्वले, अुंटवाले, अुंदीर, काळवीट, कुत्रे, श्वान, कोकरे, कोल्हे, खेकडे, गाढवे, गाय,गोम , घोडे, घोरपडे, घोणस, घोणसे, जिराफे, झुरळे, डुकरे, डोंगळे, तरस, नागे, बकरे,बैले, बोकड, बोकडे, मुंगळे, मुंगी, मुंगे, सरडे, ससे, सापे, सांबरे, सिंह, हत्ती, हत्ते,हरणे वगैर♍'वाघ्ये, वाघ, वाघे किंवा वाघिरे'असे रूढ झाले असावे.अेखाद्याला वाघाच्या शिकारीचाछंद असल्यामुळे त्याने बर्यािच वाघांची शिकार केलेली असावी म्हणून त्या कुटुंबाचे आडनाव'वाघमारे' पडले असावे. परंतू वाघचोर, वाघचोरे किंवा वाघचौरे ही आडनावे रूढ झाल्याचेमात्र खरोखरच आश्चर्य वाटते. आता, वाघ ही काय चोरी करण्याची वस्तू आहे की चोरी करण्यासारखा प्राणी आहे?♍'वाघचवडे, वाघचवरे, वाघचौरे, वाघचौंडे' ही आडनावे बहुतेक काही आडनावांचे अपभ्रंश असावेत. 'वाघनखे किंव वाघपंजे' या आडनावांची माणसे जर तुमच्या आसपास वावरत असतील तर जरा जपूनच राहिले पाहिजे. 'वाघडोळे' हे आडनाव वाघासारखे लाल डोळे असल्यामुळे पडले असावे. 'वाघमळे' हे आडनाव कसे पडले असावे याचा मात्र अंदाज करता येत नाही.
आडनावात वाघ असलेली आणखी काही आडनांवे - काळवाघे, तांबेवाघ, परतवाघ व्याघ्रळकर, वाघ्रळकर, वाघदर, वाघपांजर, वाघराळकर,वाघरी, वाघरु, वाघरे, वाघलगावकर, वाघवले, वाघसकर, वाघळकर, वाघळे, वाघंबे, वाघंबेकर,वाघाटे, वाघाडे, वाघापूरकर, वाघीकर वगैरे. वाघाचे कातडे अंगाभोवती गुंडाळून राहणारे ते 'वाघवस्त्रे' झाले असावे.वाघासारख्याच आडनावाच्या स्वरूपात 'गाय' हा प्राणी आहे. 'गाय' हे आडनाव तर आहेच शिवाय वाघासारखेच 'गायचोर' आणि 'गायडोळे'ही सुद्धा आडनावे आहेत. गायकर, गायकैवारी, गायचारे, गायतोंडे, गायधनी, गायदंडे, गायमार,गायमुखे ही सुद्धा आडनावे आहेत. 'वाघमळे' या आडनावासारखे 'गायसमुद्रे' हे ही आडनाव वैशिष्ठयपूर्ण वाटते. गायखे, गायगोळे, गायटे, गायधने, गायंगी ही आणखी काही 'गाय' असलेली आडनावे आहेत.
केवळ उदाहरणादाखल काही आडनावांचा उल्लेख केला. त्या आडनावांच्या कुटुंबातील व्यक्तिंचा अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही हे कृपया लक्षात घ्यावे.♍
माहिती सेवा गृप
