येथे टोळची भाजी करून खातात
---------------------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
-------------------------------------
भारतात टोळधाडीने अक्षरशः हैदोस घातला आहे. टोळ किंवा नाकतोडे लाखोंच्या, कोट्यवधींच्या संख्येने शेतावर हल्ला करतात आणि पिकेच्या पिके फस्त करतात.
केनियाची राजधानी नैरोबीतील लोक मात्र टोळधाडीला अजिबात घाबरत नाहीत; तर ते यास संधी म्हणून पाहतात. कारण यापासून ते अनेक खाद्यपदार्थ तयार करतात आणि ते आवडीने फस्तही करतात.
नैरोबीमध्ये टोळ अनेक प्रकारे खाल्ले जातात. तेथे टोळापासून बनवलेले ग्रीन सॅलड अथवा कबाब फारच लोकप्रिय आहेत. हॉटेलमध्ये तर ऑर्डरप्रमाणे काही वेळात असे अनेक मेन्यू तयार करून ग्राहकांना पुरवले जातात. उल्लेखनीय म्हणजे टोळांना केनियात ‘उडते प्रोटिन’ म्हणून ओळखले जाते. तेथील एक संशोधक ख्रिस्टॅनस टांगा यांच्या मते, लोकांनी टोळांना आदि मानवाचे खाद्य न समजून त्यांना दूर पळविण्याऐवजी त्यांचे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी पुढे यावे. ते पुढे असेही म्हणतात की, टोळ हे आपल्या शेताचे प्रचंड नुकसान करतात. ते करत असताना टोळांना लाज वाटत नाही तर माणसाने त्यांना खाताना का बाळगावी?
केवळ केनियातच टोळ खाद्यपदार्थ म्हणून खाल्ले जातात असे नाही; तर 2013 मध्ये इस्रायलमध्ये टोळधाड आली होती, तेव्हा तेथील लोकांनी टोळ फ्राय करून खाल्ले होते. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियातही 2004 मध्ये टोळधाड आली तेव्हा तेथील लोकांनी टोळांना भोजन बनविले होते. या देशात तर टोळांना ‘हवेत उडणारे प्रॉन’ म्हणून ओळखतात.