या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो

या मंदिरात पाण्याने दिवा लावला जातो 

माहिती सेवा ग्रूप,





मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात "गाडिया"नावाचं गाव आहे. 
भोपाळ शहरापासून जवळ पास दोनशे किमी वरील नालखेडा तालुक्यात गाडिया नावाचे हे गाव वसले आहे आणि ह्या गावातून कालीसिंध नदी वाहते जिच्या घाटावर आहे हे चमत्कारी गाडियाघाट माता मंदिर.ह्या गावात कालीसिंध नदीच्या काठावरील हे देवीचे मंदिर ओळखलं जातं ‘गाडिया घाट वाली माता का मंदिर’ या नावाने.
इतर मंदिरात कायम तेल किंवा तुपाचे दिवे तेवत असतात हे आपल्याला माहीतच आहे. इथे मात्र दिवा तेवत आहे पाण्याने. 
जवळच असलेल्या कालीसिंध नदीच्या पाण्यानेच इथे दीप लावला जाऊ लागला आणि ही परंपरा आजही कायम आहे. या मंदिरातील पुजारींच्यामते या मंदिरात जळणारी जी ज्योत आहे तिच्यात कोणत्यही प्रकारचं तेल, मेण, किंव कोणतीही संसाधनं घातली जात नाहीत.पुजारी सिद्धूसिंह असं सांगतात की अनेक वर्षींपूर्वी त्यांच्या स्वप्नात देवी आली होती. आणि त्या देवीने पाणी घालून त्यांना दिेवे लावण्यास सांगितले. त्यामुळे अनेक वर्षीपासून मंदिरातील पुजारींनी पाणी घालून दिवे लावण्याचं कार्य सुरू ठेवले आहे.नदीचे पाणी दिव्यात घालताच ते तेलकट तरल पदार्थ सारखे दिसू लागते आणि वात पेटवल्यास लगेच दिवा प्रज्वलित होतो.
पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढते की, हे मंदिर पाण्याखाली जाते. पावसाळा संपल्या नंतर, शारदीय नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी पुन्हा मंदिर उघडते आणि दिवा लावला जातो.
हा चमत्कार पाहण्यासाठी इथे आजूबाजूच्या गावातीलच नव्हे तर दूर वरून ही भाविक येत असतात. खासकरून नवरात्रात तर येथे दर्शनासाठी तुडुंब गर्दी असते.
----------------------------------------
माहिती सेवा ग्रूप,
----------------------------------------





---------------------------------------- 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने