भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

 भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या! 


  माहिती सेवा ग्रूप 

फेसबुक लिंक https://bit.ly/2ZSb7Re
आसाम राज्यात दिमा हसाओ जिल्ह्यात जातिंगा नावाच एक गाव आहे. येथील कछार नावाच्या दरीमध्ये स्वत:ला झोकून देऊन पक्षी सामुहिक आत्महत्या करतात, या विलक्षण गोष्टीमुळे हे गाव जगभरात चर्चेत आहे.@ पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात अनेक पक्षी येथे येतात,

पक्षी करतात आत्महत्या!
पण त्यातील अतिशय कमी पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात. एक गोष्ट मात्र आवर्जून विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या काळात अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पक्षी उडायचे थांबतात.@
ते स्वत:चे पंख फडकावत नाहीत आणि प्रकाशाच्या दिशेने स्वत:ला खाली झोकून देतात.@ जणू ते स्वत:वरचा ताबा हरवून बसतात आणि एखाद्या वस्तूला धडकून खाली पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो.
गेल्या १०० वर्षांपासून न चुकता दरवर्षी ही घटना घडते. या आत्महत्येमध्ये जवळपास ४४ जातीच्या चिमण्यांचा समावेश असतो. या घटनेचा शोधलावण्यासाठी सरकारने प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सेन गुप्ता यांना पाचारण केल होत. @त्यांनी केलेल्या निरीक्षणातून असा सिद्धांत मांडला की, जेव्हा धुकं पडत आणि हवा जोरात वाहते तेव्हा येथील प्रदेशाच्या चुंबकीय स्थितीमध्ये मोठा फरक पडतो.
याच कारणामुळे पक्षी विचित्र वागतात आणि प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात.@
पण अजूनही न थांबलेल्या पक्ष्यांच्या आत्महत्येचं नेमकं कोड गुलदस्त्यातचं आहे !

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने