‘इथे’ भरतो नवरदेवांचा बाजार!
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_
मधुबनी : जगभरात अनेक विचित्र परंपरा पाहायला मिळत असतात.https://m.facebook.com/story.php?story_fbid=202829830114948&id=100011637976439
काळाच्या ओघात अनेक परंपरा लुप्त झाल्या असल्या तरी अनेक अद्यापही सुरूच आहेत. बिहारमध्ये मधुबनी येथेही अशीच एक परंपरा आहे.♍
तिथे दरवर्षी नवरदेवांचा चक्क बाजार भरतो आणि वरांची विक्री होते! मधुबनी हे ठिकाण खरे तर हस्तकलेसाठी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. मात्र, तेथील ही परंपराही चर्चेत असते. या ठिकाणी तरुणांची लग्नासाठी चक्क खरेदी-विक्री होते.♍ स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अशी परंपरा तिथे सन 1310 पासून सुरू आहे. या जत्रेत वधूचे आई-वडील आपल्या कन्येसाठी मनपसंत वर खरेदी करतात. पसंती जमली की दोन्ही पक्ष तिथेच चर्चा करतात आणि ठरले की लगेच याबाबतचे रजिस्ट्रेशन करून लग्नही लावले जाते. मिथिला नरेश हरी सिंह देव यांनी ही परंपरा सुरू केली होती, असे म्हटले जाते. त्यामागे हुंड्याची प्रथा रोखण्याचा हेतू होता. आजही या ठिकाणी ही परंपरा पाळली जाते, मात्र त्यामध्ये आता बहुतांशी गरीब कुटुंबातीलच लोक सहभागी होतात.♍
u